मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WPL 2023 Prize Money : महिला प्रीमियर लीगच्या विजेत्या किती पैसे मिळणार? रक्कम PSL च्या तिप्पट

WPL 2023 Prize Money : महिला प्रीमियर लीगच्या विजेत्या किती पैसे मिळणार? रक्कम PSL च्या तिप्पट

Mar 26, 2023, 05:57 PM IST

  •  WPL 2023 Prize Money Details  महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) पहिला अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (MI VS DC) यांच्यात होणार आहे. हा सामना आज रविवारी (२६ मार्च) मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.

WPL 2023 Prize Money

WPL 2023 Prize Money Details महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) पहिला अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (MI VS DC) यांच्यात होणार आहे. हा सामना आज रविवारी (२६ मार्च) मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.

  •  WPL 2023 Prize Money Details  महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) पहिला अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (MI VS DC) यांच्यात होणार आहे. हा सामना आज रविवारी (२६ मार्च) मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.

Delhi Capitals vs Mumbai Indians WPL final : महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना मुंबई इंडियन्सशी (MI VS DC WPL 2023) होणार आहे. उभय संघांमधील हा सामना आज (२६ मार्च) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालामाल होणार आहे. दिल्ली किंवा मुंबईचा संघ आज ट्रॉफी जिंकण्यासोबत बक्षीस रक्कम म्हणून १० कोटी रुपये घरी नेईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उपविजेत्या संघाला ६ कोटी रुपये मिळणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

आयपीएलच्या तुलनेत ही बक्षीस रक्कम निम्मी आहे. गेल्या वर्षी आयपीएल चॅम्पियन बनलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाला बक्षीस म्हणून २० कोटी रुपये मिळाले होते. त्याचवेळी उपविजेत्या राजस्थान रॉयल्सला १२.५ कोटी रुपये मिळाले होते.

तर महिला प्रीमियर लीगमध्ये तिसऱ्या स्थानावर अलेल्या यूपी वॉरियर्सला १ कोटी रुपयांवर समाधान मानावे लागणार आहे.

पीएसएल चॅम्पियन लाहोर कलंदरला ३.४ कोटी रुपये मिळाले

जर आपण महिला प्रीमियर लीगमधील चॅम्पियन संघाला मिळालेल्या रकमेची तुलना पाकिस्तान सुपर लीग (PSL) सोबत केली, तर यात खूप फरक आहे. पीएसएलमध्ये यावेळी चॅम्पियन बनलेल्या लाहोर कलंदरच्या संघाला ३.४ कोटी रुपये मिळाले आहेत. अशा स्थितीत महिला प्रीमियर लीगमधील विजेत्या संघाला पीएसएल चॅम्पियनपेक्षा जवळपास तिप्पट अधिक रक्कम मिळणार आहे.

PSL vs WPL : उपविजेत्या संघाला किती पैसे मिळणार?

पीएसएलमधील उपविजेत्या मुलतान सुलतान्सच्या संघाला २.३ कोटी रुपये मिळाले. अशा परिस्थितीत महिला प्रीमियर लीगमध्ये उपविजेत्या संघाला पीएसएलच्या उपविजेत्या संघाच्या तुलनेत दुप्पट रक्कम मिळेल.