मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Who is Simran Shaikh : धारावीच्या झोपडपट्टीतून नव्या स्टारचा उदय, सिमरन शेख WPL गाजवण्यास सज्ज

Who is Simran Shaikh : धारावीच्या झोपडपट्टीतून नव्या स्टारचा उदय, सिमरन शेख WPL गाजवण्यास सज्ज

Mar 05, 2023, 11:40 AM IST

    • Simran Shaikh up Warriorz wpl 2023 : धारावीच्या झोपडपट्टीतून एक नवी स्टार उदयास आली आहे. क्रिकेटर सिमरन शेख महिला प्रीमियर लीगमध्ये आपला दम दाखवण्यास सज्ज झाली आहे. सिमरनला यूपी वॉरियर्स संघाने आपल्या संघात घेतले आहे.
Simran Shaikh (WPL)

Simran Shaikh up Warriorz wpl 2023 : धारावीच्या झोपडपट्टीतून एक नवी स्टार उदयास आली आहे. क्रिकेटर सिमरन शेख महिला प्रीमियर लीगमध्ये आपला दम दाखवण्यास सज्ज झाली आहे. सिमरनला यूपी वॉरियर्स संघाने आपल्या संघात घेतले आहे.

    • Simran Shaikh up Warriorz wpl 2023 : धारावीच्या झोपडपट्टीतून एक नवी स्टार उदयास आली आहे. क्रिकेटर सिमरन शेख महिला प्रीमियर लीगमध्ये आपला दम दाखवण्यास सज्ज झाली आहे. सिमरनला यूपी वॉरियर्स संघाने आपल्या संघात घेतले आहे.

Simran Shaikh (WPL) Womens Premier League : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या धर्तीवर, बीसीसीआयने महिला प्रीमियर लीग (WPL) सुरू केली आहे. या लीगमुळे महिला क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या लीगच्या माध्यमातून छोट्या-छोट्या ठिकाणांहून येणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंना आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

अशाच एका महिला खेळाडूला या लीगमध्ये संधी मिळाली आहे. या मुलीचे आतापर्यंतचे आयुष्य मुंबईतील धारावीच्या झोपडपट्टीत गेले आहे. सिमरन शेख असे या महिला खेळाडूचे नाव आहे. २१ वर्षीय सिमरन लेग-स्पिनर आहे आणि उजव्या हाताने फलंदाजी करते.

धारावी झोपडपट्टी आशिया खंडातील सर्वात मोठी वस्ती मानली जाते. ५५० एकरांवर पसरलेल्या या धारावीच्या वस्तीत विविध धर्माचे आणि विविध वर्गाचे जळपास १० लाख लोक राहतात. मूलभूत सुविधांपासून दूर असलेल्या या वस्तीत १०० फुटांच्या झोपडीत ८ ते १० लोक राहतात. अशा प्रकारच्या वस्तीतून बाहेर पडून वुमन्स प्रीमियर लीगसारख्या मोठ्या स्पर्धेत स्थान मिळवणे ही एक वेगळी क्षमता आहे. 

युपी वॉरियर्सकडून खेळणार

यंदाच्या महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझनच्या लिलावात सिमरनचा सहभाग होता. सिमरनची बेस प्राइस १० लाख रुपये होती. जेव्हा सिमरनचे नाव समोर आले तेव्हा यूपी वॉरियर्स फ्रेंचायझीने सर्वात आधी बोली लावली आणि तिला मूळ किंमतीतच विकत घेतले. या लीगमधील यूपी वॉरियर्स संघाचा पहिला सामना ५ मार्च रोजी गुजरात जायंट्सविरुद्ध होणार आहे.

सिमरनने आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात धारावीच्या रस्त्यांवरूनच केली होती. ती आधी मुलांसोबत क्रिकेट खेळायची. यानंतर ती युनायटेड क्लबचा भाग बनली. इथून तिला क्रिकेट समजणे आणखी सोपे झाले.

सिमरनला ४ बहिणी आणि ३ भाऊ

सिमरनला ४ बहिणी आणि ३ भाऊ आहोत. वडील वायरिंगचे काम करतात. दोन बहिणी तिच्यापेक्षा मोठ्या आहेत. बाकी सगळे लहान आहेत. सिमरनच्या लहानपणापासून आजपर्यंत तिच्या क्रिकेटमध्ये कोणीही हस्तक्षेप केला नाही. तिला घरातून सर्वांचा पाठिंबा मिळाला.

देशासाठी विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न

सिमरन दहावीत नापास झाल्यानंतर तिने शिक्षण सोडले. त्यानंतर क्रिकेटमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत स्थानिक क्रिकेट स्पर्धा खेळण्याचा अनुभव घेतला. १९ वर्षांखालील क्रिकेटही तिथे खेळले जात होते. यानंतर तिला मुंबईच्या वरिष्ठ संघातही खेळण्याची संधी मिळाली. सिमरन मधल्या फळीत फलंदाजी करते. भारतीय महिला संघात खेळण्याचे तिचे स्वप्न आहे. एवढेच नाही तर देशासाठी विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही सिमरनने पाहिले आहे.

पुढील बातम्या