मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WPL 2023 : भारतीय खेळाडूंना कर्णधार बनवा! स्पर्धेसोबत नव्या वादालाही सुरुवात

WPL 2023 : भारतीय खेळाडूंना कर्णधार बनवा! स्पर्धेसोबत नव्या वादालाही सुरुवात

Mar 04, 2023, 08:08 PM IST

    • WPL 2023: महिला प्रीमियरल लीगला सुरुवात झाली आहे. मात्र, त्याचबरोबर एका वादाला देखील सुरुवात झाली आहे. भारताची माजी कर्णधार अंजूम चोप्राच्या मते भारतीय खेळाडूंना कर्णधारपद मिळाले असते तर बरे झाले असते.
anjum chopra on WPL 2023

WPL 2023: महिला प्रीमियरल लीगला सुरुवात झाली आहे. मात्र, त्याचबरोबर एका वादाला देखील सुरुवात झाली आहे. भारताची माजी कर्णधार अंजूम चोप्राच्या मते भारतीय खेळाडूंना कर्णधारपद मिळाले असते तर बरे झाले असते.

    • WPL 2023: महिला प्रीमियरल लीगला सुरुवात झाली आहे. मात्र, त्याचबरोबर एका वादाला देखील सुरुवात झाली आहे. भारताची माजी कर्णधार अंजूम चोप्राच्या मते भारतीय खेळाडूंना कर्णधारपद मिळाले असते तर बरे झाले असते.

anjum chopra on WPL 2023 : महिला प्रीमियर लीगला (WPL) आज ४ मार्चपासून दणक्यात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत ५ संघ खेळणार आहेत. यतील बहुतांश संघांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी परदेशी खेळाडूंवर आहे. यामुळे भारताची माजी कर्णधार अंजुम चोप्रा निराश आहे. सक्षम भारतीय खेळाडूंवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवायला हवी होती, असे तिचे मत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

एका ऑनलाइन मीडिया सेशनमध्ये अंजुम म्हणाली की, 'बहुतांश संघांनी कर्णधार म्हणून परदेशी खेळाडूंची निवड केली आहे हे मला आवडले नाही. ही एक भारतीय लीग आहे आणि ती भारतीय परिस्थितीत खेळवली जाईल. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडूंमध्ये क्षमता असेल तर त्यांनी कर्णधार बनवायला हवे होते".

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी अनुक्रमे हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या रूपाने भारतीय खेळाडूंना कर्णधार बनवले आहे. तर इतर संघांनी नेतृत्वासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पसंती दिली आहे. यामध्ये मेग लॅनिंग (दिल्ली कॅपिटल्स), बेथ मुनी (गुजरात जायंट्स) आणि अॅलिसा हिली (यूपी वॉरियर्स) कर्णधाराच्या भूमिकेत आहेत.

अंजुम पुढे म्हणाली, 'माझ्या मते दीप्ती शर्मा (यूपी वॉरियर्स) हिला कर्णधार बनवायला हवे होते. तिने महिला टी-20 चॅलेंजमध्ये संघाचे नेतृत्व केले.' मात्र अंजुमने हे ही मान्य केले आहे की, ऑस्ट्रेलियाकडे भारतीयांपेक्षा अनुभवी खेळाडू आहेत.

ऑस्ट्रेलियन खेळाडू हे वर्ल्ड चॅम्पियन आहेत आणि त्यांना त्यांच्या देशातील आघाडीच्या संघांचा अनुभव आहे. मी त्यांच्या (ऑस्ट्रेलियन खेळाडू) अनुभवाशी (आंतरराष्ट्रीय स्तरावर) पूर्णपणे सहमत आहे. त्यामुळे मेग लॅनिंग असताना जेमिमा रॉड्रिग्जला कर्णधार बनवता येणार नाही", असेही अंजूम चोप्रा म्हणाली.

पुढील बातम्या