मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sunil Chhetri Controversial Goal : सुनील छेत्रीच्या गोलवरून राडा, केरळ ब्लास्टर्स संघानं मैदान सोडलं

Sunil Chhetri Controversial Goal : सुनील छेत्रीच्या गोलवरून राडा, केरळ ब्लास्टर्स संघानं मैदान सोडलं

Mar 04, 2023, 07:15 PM IST

    • Sunil Chhetri Controversial Goal ISL : आयएसएलमध्ये बेंगळुरू एफसी आणि केरळ ब्लास्टर्स यांच्यातील प्लेऑफचा सामना खेळला गेला. या सामन्यात बराच (Indian Super League Contoversy) गदारोळ झाला. बेंगळुरू एफसीचा खेळाडू सुनील छेत्रीने गोल केल्यानंतर हा संपूर्ण गोंधळ झाला. या निर्णयाचा निषेध करत केरळ ब्लास्टर्सचे खेळाडू मैदानातून (ISL Contoversy) बाहेर पडले, त्यानंतर बेंगळुरूला विजेता घोषित करण्यात आले.
Sunil Chhetri Controversial Goal

Sunil Chhetri Controversial Goal ISL : आयएसएलमध्ये बेंगळुरू एफसी आणि केरळ ब्लास्टर्स यांच्यातील प्लेऑफचा सामना खेळला गेला. या सामन्यात बराच (Indian Super League Contoversy) गदारोळ झाला. बेंगळुरू एफसीचा खेळाडू सुनील छेत्रीने गोल केल्यानंतर हा संपूर्ण गोंधळ झाला. या निर्णयाचा निषेध करत केरळ ब्लास्टर्सचे खेळाडू मैदानातून (ISL Contoversy) बाहेर पडले, त्यानंतर बेंगळुरूला विजेता घोषित करण्यात आले.

    • Sunil Chhetri Controversial Goal ISL : आयएसएलमध्ये बेंगळुरू एफसी आणि केरळ ब्लास्टर्स यांच्यातील प्लेऑफचा सामना खेळला गेला. या सामन्यात बराच (Indian Super League Contoversy) गदारोळ झाला. बेंगळुरू एफसीचा खेळाडू सुनील छेत्रीने गोल केल्यानंतर हा संपूर्ण गोंधळ झाला. या निर्णयाचा निषेध करत केरळ ब्लास्टर्सचे खेळाडू मैदानातून (ISL Contoversy) बाहेर पडले, त्यानंतर बेंगळुरूला विजेता घोषित करण्यात आले.

Sunil Chhetri gaol Indian Super League Contoversy : इंडियन सुपर लीगमध्ये (ISL) शुक्रवारी (३ मार्च) बेंगळुरू एफसी आणि केरळ ब्लास्टर्स प्लेऑफचा सामना खेळला गेला. या सामन्यात चांगलाच राडा पाहायला मिळाला. त्यामुळे या सामन्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. बेंगळुरूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर हा प्लेऑफचा सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान बेंगळुरू आणि केरळच्या संघांमध्ये भांडण झाले. यानंतर केरळचे खेळाडू विरोध करत सामना मध्यंतरी सोडून थेट मैदानाबाहेर गेले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सामन्याच्या अतिरिक्त वेळेत (एक्स्ट्रा टाइम) ही घटना घडली. बेंगळुरू एफसीचा कर्णधार सुनील छेत्रीने फ्री कीकवर एक गोल केला. यानंतर या सर्व राड्याला सुरुवात झाली. इंडियन सुपर लीगच्या इतिहासात एखाद्या निर्णयाच्या निषेधार्थ संघाने मैदानाबाहेर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नेमकं काय घडलं?

सामन्यात दोन्ही संघ निर्धारित वेळेपर्यंत ०-० असे बरोबरीत होते, त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळेच्या पहिल्या हाफच्या ६व्या मिनिटाला मॅच रेफ्रीने बॉक्सबाहेरून बेंगळुरू एफसीला फ्री किक दिली. रेफ्रींच्या शिट्टीनंतर केरळचा गोलरक्षक आपल्या सहकारी खेळाडूंना काहीतरी सांगत होता, पण त्याचवेळी सुनील छेत्रीने फ्री किक घेतली आणि गोल झाला.

यानंतर यावर केरळचे खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणाले की, गोलरक्षक तयार नव्हता, मग फ्री किकला परवानगी कशी दिली. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे फ्री किकचा निर्णय दिल्यानंतर रेफ्री खेळाडूंसमोर भिंत बांधतात आणि खुणाही करतात. पण, या फ्री किकदरम्यान असे काहीही दिसले नाही".

केरळ ब्लास्टर्सने रेफ्रिंशी वाद घातला

गोल केल्यानंतर बंगळुरूच्या खेळाडूंनी आपल्या घरच्या चाहत्यांसमोर आनंद साजरा केला. त्याचवेळी केरळ ब्लास्टर्सचे सर्बियन प्रशिक्षक इव्हान वुकोमानोविच यांनी आपल्या संघाला मैदानाबाहेर येण्याचा इशारा केला. वुकोमानोविच आणि त्यांच्या खेळाडूंनी मैदान सोडण्यापूर्वी सामना अधिकाऱ्यांशी वाद घातला. दुसरीकडे, बेंगळुरू संघ मैदानावर उभा राहिला आणि २० मिनिटे प्रतीक्षा केल्यानंतर, बेंगळुरू एफसीला विजेता घोषित करण्यात आले. बेंगळुरू एफसी आता उपांत्य फेरीत टेबल टॉपर्स मुंबई सिटीविरुद्ध खेळेल.

पुढील बातम्या