मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Video: सानिया रडू लागली, बोलताही येत नव्हतं! प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, त्यानंतर म्हणाली...

Video: सानिया रडू लागली, बोलताही येत नव्हतं! प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, त्यानंतर म्हणाली...

Jan 27, 2023, 11:14 AM IST

  • Sania Mirza Australian Open : भारताची महान महिला टेनिस स्टार सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिच्या ग्रँडस्लॅम कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. मिश्र दुहेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत त्यांचा पराभव झाला. सामन्यानंतर तिला अश्रू अनावर झाले.

Sania Mirza Australian Open

Sania Mirza Australian Open : भारताची महान महिला टेनिस स्टार सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिच्या ग्रँडस्लॅम कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. मिश्र दुहेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत त्यांचा पराभव झाला. सामन्यानंतर तिला अश्रू अनावर झाले.

  • Sania Mirza Australian Open : भारताची महान महिला टेनिस स्टार सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिच्या ग्रँडस्लॅम कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. मिश्र दुहेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत त्यांचा पराभव झाला. सामन्यानंतर तिला अश्रू अनावर झाले.

Sania Mirza and Rohan Bopanna in Australian Open : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या करिअरचा समारोप झाला आहे. ती ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ च्या मिश्र दुहेरीच्या विजेतेपदाच्या सामन्यात पराभूत झाली. आपल्या करिअरच्या शेवटच्या सामन्यानंतर तिला अश्रू अनावर झाले. तिचा जोडीदार रोहन बोपन्ना तिला शुभेच्छा देत होता तेव्हा तिला रडू कोसळले. जेतेपदाच्या सानिया-रोहन बोपण्णाच्या जोडीला ब्राझीलच्या स्टेफनी आणि माटोस यांनी पराभूत केले.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

सामना संपल्यानंतर रोहन बोपण्णाने माइकमधून सानिया मिर्झाचे कौतुक केले. सानियाने तिच्या खेळाने अनेक तरुणांना कसे प्रेरित केले हे तो सांगत होता. यादरम्यान जेव्हा कॅमेरा सानियाच्या दिशेने वळला तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. यानंतर सानियाने स्वतः माइक घेतला. ती बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला काही बोलता आले नाही. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते.

यानंतर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाट केला. प्रसंगी सानियाने भावना आवरत प्रथम विरोधी ब्राझिलियन जोडीचे विजयासाठी अभिनंदन केले. त्यानंतर ती म्हणाला, 'माझी व्यावसायिक कारकीर्द २००५ मध्ये मेलबर्नमध्येच सुरू झाली होती. ग्रँडस्लॅम कारकीर्दीला निरोप देण्यासाठी यापेक्षा चांगली जागा असू शकत नाही', तिला पुन्हा रडू कोसळले.

अश्रू पुसत ती म्हणाला, 'जेव्हा येथे सेरेना विल्यम्सविरुद्ध खेळली तेव्हा ती १८ वर्षांची होती. येथे खेळणे माझ्यासाठी नेहमीच सन्मानाची गोष्ट आहे. हे माझ्यासाठी माझ्या घरासारखे आहे. हे अप्रतिम बनवल्याबद्दल सर्वांचे आभार".

सानिया मिर्झा ही भारतीय टेनिस इतिहासातील सर्वात मोठी खेळाडू आहे. सानिया मिर्झाने या खेळात प्रवेश केल्यानंतर भारतात महिला टेनिसमध्ये क्रांती झाली. तिच्या स्टारडमनंतर कित्येक मुलींनी सानिया मिर्झा बनण्याचे स्वप्न पाहिले आणि करिअरच्या दृष्टीने हा खेळ निवडला. सानियाने मिश्र दुहेरीत ३ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.