मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rahkeem Cornwall: १४० किलोच्या कॉर्नवॉलचं T20 मध्ये द्विशतक, ठोकले तब्बल 'इतके' षटकार

Rahkeem Cornwall: १४० किलोच्या कॉर्नवॉलचं T20 मध्ये द्विशतक, ठोकले तब्बल 'इतके' षटकार

Oct 06, 2022, 01:26 PM IST

    • Rahkeem Cornwall Hits Double Century In T20: अमेरिकन T20 स्पर्धेत रहकीम कॉर्नवॉलने द्विशतक ठोकले आहे. त्याने अटलांटा फायर संघाकडून खेळताना स्क्वेअर ड्राइव्हविरुद्ध ही कामगिरी केली आहे.
Rahkeem Cornwall

Rahkeem Cornwall Hits Double Century In T20: अमेरिकन T20 स्पर्धेत रहकीम कॉर्नवॉलने द्विशतक ठोकले आहे. त्याने अटलांटा फायर संघाकडून खेळताना स्क्वेअर ड्राइव्हविरुद्ध ही कामगिरी केली आहे.

    • Rahkeem Cornwall Hits Double Century In T20: अमेरिकन T20 स्पर्धेत रहकीम कॉर्नवॉलने द्विशतक ठोकले आहे. त्याने अटलांटा फायर संघाकडून खेळताना स्क्वेअर ड्राइव्हविरुद्ध ही कामगिरी केली आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा फलंदाज रहकीम कॉर्नवॉलने टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. जगातील सर्वात वजनदार फलंदाजाने अमेरिकन T20 स्पर्धेत (Atlanta Open 2022 League) द्विशतक ठोकले आहे. रहकीम कॉर्नवॉलने अटलांटा फायर संघाकडून खेळताना स्क्वेअर ड्राइव्हविरुद्ध ही कामगिरी केली.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

२९ वर्षीय रहाकीम कॉर्नवॉलने ७७ चेंडूत नाबाद २०५ धावा चोपल्या. यादरम्यान त्याने २२ षटकार आणि १७ चौकार मारले. कॉर्नवॉलचा स्ट्राइक रेट २६६.२३ इतका होता. १४० किलो वजन असलेल्या या क्रिकेटपटूने अलीकडेच कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये आपल्या स्फोटक खेळीने दहशत निर्माण केली होती.

CPL मध्ये ९१ धावांची स्फोटक खेळी खेळली

६ फूट ५ इंच उंच असलेल्या या कॅरेबियन फलंदाजाने २७ सप्टेंबर रोजी सीपीएलमध्ये ५४ चेंडूत ९१ धावांची दमदार इनिंग खेळली होती. यादरम्यान त्याचे शतक ९ धावांनी हुकले. रहकीमने त्या वेळी ११ षटकार आणि २ चौकार मारले होते. म्हणजे त्याने केवळ चौकार षटकाराने ७४ धावा केल्या होत्या. सीपीएलच्या क्वालिफायर वनमध्ये बार्बाडोस रॉयल्सकडून खेळताना गयाना अॅमेझॉन वॉरियर्सविरुद्ध त्याने हा पराक्रम केला होता.

रहकीम कॉर्नवॉलची क्रिकेट कारकीर्द

रहकीम कॉर्नवॉल वेस्ट इंडिजसाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो. तो फिरकी गोलंदाजीही करतो. त्याने ९ कसोटी सामन्यांमध्ये एकूण २३८ धावा केल्या आहेत. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर रहकीमने ३४ विकेट्स घेतल्या आहेत. रहकीम कॉर्नवॉलने ७६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २६९५ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने आपल्या फिरकी गोलंदाजीने ३५३ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.