मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Nora Fatehi FIFA WC: जेनिफर लोपेझ, शकिरानंतर फिफामध्ये आता नोराचा तोरा; उत्सुकता शिगेला

Nora Fatehi FIFA WC: जेनिफर लोपेझ, शकिरानंतर फिफामध्ये आता नोराचा तोरा; उत्सुकता शिगेला

Oct 06, 2022, 12:16 PM IST

    • Nora Fatehi To Perform At FIFA World Cup: नोरा फतेही फिफा वर्ल्ड कपमध्ये परफॉर्म करताना दिसणार आहे. यानंतर नोरा ही फिफा विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण पूर्व आशियाचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव अभिनेत्री ठरली आहे
Nora Fatehi FIFA WC

Nora Fatehi To Perform At FIFA World Cup: नोरा फतेही फिफा वर्ल्ड कपमध्ये परफॉर्म करताना दिसणार आहे. यानंतर नोरा ही फिफा विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण पूर्व आशियाचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव अभिनेत्री ठरली आहे

    • Nora Fatehi To Perform At FIFA World Cup: नोरा फतेही फिफा वर्ल्ड कपमध्ये परफॉर्म करताना दिसणार आहे. यानंतर नोरा ही फिफा विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण पूर्व आशियाचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव अभिनेत्री ठरली आहे

पुढील महिन्यापासून फिफा विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. कतार येथे होणाऱ्या विश्वचषकासाठी ३२ संघ पात्र ठरले आहेत. कतार हा विश्वचषक यजमान म्हणून खेळणार आहे. हा फिफा विश्वचषक बॉलिवूड स्टार आणि ग्लोबल आयकॉन नोरा फतेहीसाठीही खास असणार आहे. वास्तविक नोरा फिफा वर्ल्ड कपमध्ये परफॉर्म करताना दिसणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

फिफा वर्ल्ड कपच्या अँथम सॉन्गमध्ये नोराचा समावेश करण्यात आला आहे. या गाण्यात ती डान्स करताना आणि गाताना दिसणार आहे. विशेष म्हणजे या गाण्याची रिलीज डेटही निश्चित झाली आहे. हे गाणे ७ सप्टेंबरला अधिकृतपणे रिलीज होणार आहे. खुद्द नोराने ही माहिती दिली आहे.

नोरा फतेही  शकीरा आणि जेनिफर लोपेझच्या क्लबमध्ये

या बाबतीत नोरा आता शकीरा आणि जेनिफर लोपेझच्या क्लबमध्ये सामील झाली आहे. शकीराने २०१० च्या फिफा विश्वचषकाचे अँथम सॉन्ग 'वाका-वाका' सादर केले आणि गायले होते. त्याच वेळी, जेनिफर लोपेझने ब्राझीलमधील २०१४ च्या FIFA विश्वचषकाचे अँथम सॉन्ग 'वुई आर वन' हे रॅपर पिटबुलसोबत सादर केले होते.

खास म्हणजे नोरा ही फिफा विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण पूर्व आशियाचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव अभिनेत्री ठरली आहे.

२० नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात

या वर्षीचे फिफाचे अँथम सॉन्ग रेड वन या संगीत बँडने तयार केले आहे. ओपनिंग सेरेमनीमध्येही नोरा दिसणार आहे. नोराने स्वत: तिच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर या गाण्याची पहिली झलक शेअर केली आहे. याशिवाय ती फिफा विश्वचषकाच्या समारोप समारंभातही दिसू शकते. यादरम्यान नोरा हे गाणे हिंदीत गाताना दिसू शकते.

फिफा विश्वचषकात नोराच्या सहभागाने भारत आता अधिकृतपणे फिफा विश्वचषकात सामील झाला आहे. कतारमध्ये होणारी ही स्पर्धा मध्यपूर्व आणि अरब देशांमध्ये होणारी पहिली फिफा विश्वचषक स्पर्धा आहे. २० नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. फिफा वर्ल्ड कपची क्रेझ अशी आहे की जगभरातून चाहते ते पाहण्यासाठी येतात. भारतातही या स्पर्धेची वेगळीच क्रेझ आहे.

पुढील बातम्या