मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Thailand Open : पी. व्ही. सिंधूची दमदार कामगिरी, थायलंड ओपनच्या उपांत्यफेरीत धडक

Thailand Open : पी. व्ही. सिंधूची दमदार कामगिरी, थायलंड ओपनच्या उपांत्यफेरीत धडक

May 20, 2022, 06:05 PM IST

    • महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू दमदार कामगिरी करत थायलंड ओपन २०२२ च्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिने जपानची बॅडमिंटनपटू अकाने यामागुची हिचा पराभव केला.
महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू

महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू दमदार कामगिरी करत थायलंड ओपन२०२२ च्याउपांत्य फेरीपर्यंतपोहोचली आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिने जपानची बॅडमिंटनपटू अकाने यामागुची हिचा पराभव केला.

    • महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू दमदार कामगिरी करत थायलंड ओपन २०२२ च्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिने जपानची बॅडमिंटनपटू अकाने यामागुची हिचा पराभव केला.

भारताला दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या पी. व्ही. सिंधूने थायलंड ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने नुकतीच ऐतिहासिक कामगिरी करत थॉमस चषकावर नाव कोरलं होते. त्यानंतर आता सिंधुकडून पदकाची आशा वाढली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू दमदार कामगिरी करत थायलंड ओपन २०२२ च्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिने जपानची बॅडमिंटनपटू अकाने यामागुची (Akane Yamaguchi) हिचा पराभव केला.

पी.व्ही. सिंधुने भारताला रौप्य व कांस्य ही दोनऑलिम्पिक पदके मिळवून दिली आहेत. सिंधूने आपली दमदार कामगिरी कायम ठेवली असून थायलंडच्या बँकॉकमध्ये सुरु असलेल्या थायलंड ओपनमध्ये तिने सेमीफायनलपर्यंत मजल मारली आहे.

थायलंड ओपनच्या उपांत्य पूर्व फेरीत (Quarter Final) सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीवर मात देत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली आहे.आज झालेल्या सामन्यात तीन सेट्स झाले. ज्यातील दोन सेट्समध्ये विजय मिळवत सिंधूने सेमीफायनमध्ये धडक दिली. पहिला सेट जिंकून सिंधूने सुरुवातीपासून आपला दबदबा कायम ठेवत २१-१५ च्या फरकाने सेट जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये जपानच्या अकाने हिने पुनरागमन करत २०-२२ च्या फरकाने सेट जिंकला. पण अखेरच्या सेटमध्ये सिंधूने दमदार कामगिरी करत निर्णायक सेट २१-१३ या चांगल्या फरकाने आपल्या नावे करत सामनाही खिशात घातला.