मराठी बातम्या  /  क्रीडा  /  VIDEO: पुजाराचा स्लीप फिल्डींगवर भर, टीम इंडियाचा जोरदार सराव

VIDEO: पुजाराचा स्लीप फिल्डींगवर भर, टीम इंडियाचा जोरदार सराव

Jun 21, 2022, 09:53 PM IST

    • इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी भारतीय संघ चांगलाच घाम गाळत आहे. सामन्यापूर्वी पुजाराने आपल्या स्लिप फिल्डींगच्या सरावावर भर दिला. त्याचवेळी विराट  फुटबॉल खेळताना दिसला.
team india

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी भारतीय संघ चांगलाच घाम गाळत आहे. सामन्यापूर्वी पुजाराने आपल्या स्लिप फिल्डींगच्या सरावावर भर दिला. त्याचवेळी विराट फुटबॉल खेळताना दिसला.

    • इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी भारतीय संघ चांगलाच घाम गाळत आहे. सामन्यापूर्वी पुजाराने आपल्या स्लिप फिल्डींगच्या सरावावर भर दिला. त्याचवेळी विराट  फुटबॉल खेळताना दिसला.

टीम इंडिया एक टेस्ट मॅच, तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेली आहे. यावेळी कसोटी संघातील अनेक खेळाडूंनी सराव सत्रादरम्यान चांगलाच घाम गाळल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर चेतेश्वर पुजारा आपल्या खेळाच्या प्रत्येक बाबतीत लक्ष देत आहे. भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया कसलीही कसर सोडू इच्छित नाही. १ जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सर्व खेळाडूंनी कसून सराव केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

भारतीय संघ सध्या लिसेस्टरमध्ये मुक्कामी आहे. या ठिकाणहूनच भारतीय खेळाडूंचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू कसून सराव करताना दिसत आहेत. या व्हिडिओंमध्ये पुजारा खास स्लिप फिल्डिंगची तयारी करताना दिसत आहे.

दुसऱ्या व्हिडिओमध्ये विराट कोहली इतर खेळाडूंसोबत फुटबॉल खेळताना दिसत आहे. त्याच्यासोबत मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा आणि केएस भरत देखील दिसत आहेत. मात्र, या व्हिडिओमध्ये फक्त पुजारा आणि शमी हेच जास्त अॅक्टिव्ह दिसत आहेत.

भारताच्या कसोटी संघातील बहुतांश खेळाडू हे १६ जून रोजी इंग्लंडला पोहोचले होते. पोहोचताच त्यांनी सरावाला देखिल सुरुवात केली होती. यानंतर कर्णधार रोहित शर्माही इंग्लंडला पोहोचला. तर आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका संपल्यानंतर शेवटी प्रशिक्षक राहुल द्रविडही रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरसोबत इंग्लंडमध्ये संघात दाखल झाले आहेत. कोरोनाची लागण झाल्यामुळे अश्विन अद्याप इंग्लंडला पोहोचला नाही. मात्र, तो तंदुरुस्त होऊन सामन्यापूर्वी संघात सामील होण्याची शक्यता आहे.

कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया-

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज , उमेश यादव , प्रसिद्ध कृष्णा.