मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवने खरेदी केली २.१५ कोटींची कार, पाहा फोटो

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवने खरेदी केली २.१५ कोटींची कार, पाहा फोटो

Aug 12, 2022, 08:20 PM IST

    • भारतीय क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा सदस्य सूर्यकुमार यादव याने नवी कोरी मर्सिडीज-एएमजी जीएलएस 63 एसयूव्ही खरेदी केली आहे.
suryakumar yadav (photo- autohangar/instagram)

भारतीय क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा सदस्य सूर्यकुमार यादव याने नवी कोरी मर्सिडीज-एएमजी जीएलएस 63 एसयूव्ही खरेदी केली आहे.

    • भारतीय क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा सदस्य सूर्यकुमार यादव याने नवी कोरी मर्सिडीज-एएमजी जीएलएस 63 एसयूव्ही खरेदी केली आहे.

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने काही दिवसांपूर्वीच Mercedes-AMG GLS 63 बुक केली होती. याची माहितीही त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. आता त्याच अलिशान मर्सिडीज एसयूव्हीची डिलिव्हरी ऑटो हँगरद्वारे मिळाली आहे. सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी यानी या अलिशान गाडीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

ऑटोहॅंगरच्या इंस्टाग्रामवर सूर्यकुमार यादव आणि देविशाचे कारसोबतचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. सूर्याने Mercedes-Benz GLS 400 D SUV घेतली आहे. मर्सिडीस बेंझच्या भारतातील वेबसाईटनुसार या अलिशान कारची किंमत ही २.१५ कोटी रुपये इतकी आहे.

दरम्यान, सूर्यकुमार यादवने नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत शानदार कामगिरी केली. या मालिकेत कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून नवीन भूमिकेत दिसला. ३१ वर्षीय सुर्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ७६ धावा केल्या होत्या.

त्या सामन्यात कर्णधार रोहित दुखापतग्रस्त होऊन तंबूत परतला होता. त्यानंतर सुर्याने भारतीय डावाची धुरा सांभाळत यजमानांनी दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाला संकटातून बाहेर काढले. श्रेयस अय्यर आणि नंतर ऋषभ पंत यांच्यासोबत महत्त्वाची भागीदारी करत सूर्याने भारताला आरामात विजय मिळनून दिला त्याने ४४ चेंडूत ७६ धावांची खेळी केली होती. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची पाच सामन्यांची टी-२- मालिका ४-१ ने जिंकली.