मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 Orange Purple Cap : ऑरेंज कॅपवर शुभमन गिलचा कब्जा, तर पर्पल कॅपसाठी या ३ गोलंदाजांमध्ये चुरस

IPL 2023 Orange Purple Cap : ऑरेंज कॅपवर शुभमन गिलचा कब्जा, तर पर्पल कॅपसाठी या ३ गोलंदाजांमध्ये चुरस

May 27, 2023, 02:59 PM IST

    • IPL 2023 Orange Purple Cap : IPL 2023 मध्ये आतापर्यंत आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसकडे ऑरेंज कॅप होती. पण आता शुभमन गिलने (shubman gill) ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे.
IPL 2023 Orange & Purple Cap

IPL 2023 Orange Purple Cap : IPL 2023 मध्ये आतापर्यंत आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसकडे ऑरेंज कॅप होती. पण आता शुभमन गिलने (shubman gill) ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे.

    • IPL 2023 Orange Purple Cap : IPL 2023 मध्ये आतापर्यंत आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसकडे ऑरेंज कॅप होती. पण आता शुभमन गिलने (shubman gill) ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे.

GT vs MI IPL 2023 Qualifier 2 : गुजरात टायटन्सने पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या क्वालिफायर (GT VS MI) सामन्यात गतविजेत्या गुजरातची कामगिरी अप्रतिम झाली. शुभमन गिलने शानदार फलंदाजी करताना या मोसमातील तिसरे शतक झळकावले, त्यानंतर मोहित शर्माने चेंडूने मुंबईच्या ५ फलंदाजांची शिकार केली.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीस आलेल्या शुभमन गिल आणि साहा यांनी गुजरात टायटन्सला धडाकेबाज सुरुवात करून दिली. गिलने स्फोटक फलंदाजी करत अवघ्या ६० चेंडूत १२९ धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी साई सुदर्शनने ३१ चेंडूत ४३ धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार हार्दिक पांड्याने १३ चेंडूत २८ धावा ठोकल्या, ज्यामुळे गुजरातने आयपीएल प्लेऑफमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली.

मुंबईचे अनुभवी फलंदाज सुपर फ्लॉप

१३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि नेहल वढेरा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. त्याचवेळी कॅमेरून ग्रीननेही अवघ्या ३० धावा केल्या. सूर्यकुमार यादवने ३८ चेंडूत ६१ धावांची तुफानी खेळी नक्कीच खेळली, पण ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही.

गिलचा ऑरेंज कॅपवर कब्जा

IPL 2023 मध्ये आतापर्यंत आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसकडे ऑरेंज कॅप होती. पण आता शुभमन गिलने ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे. गिलने १२९ धावांची खेळी करत ऑरेंज कॅप मिळवली. गिलने या मोसमातील १६ सामन्यांमध्ये ८५१ धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत डुप्लेसी आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. डुप्लेसीसने आयपीएल 2023 मध्ये ७३० धावा केल्या होत्या. या यादीत विराट कोहली ६३९ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर यशस्वी जैस्वाल ६२५ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. डेव्हॉन कॉनवे ६२५ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

शमीकडे पर्पल कॅप

मोहम्मद शमीकडे पर्पल कॅप कायम आहे. या मोसमात खेळल्या गेलेल्या १६ सामन्यात २८ बळी घेऊन शमी अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर राशिद खान २७ विकेट्स घेऊन या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये ५ विकेट घेत मोहित शर्मा पर्पल कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पियुष चावला २२ विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे, तर युजवेंद्र चहल २१ विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहे.