मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shubman Gill Century : शुभमन गिलचं आणखी एक शतक, 'या' मोठ्या विक्रमात बाबर आझमची बरोबरी

Shubman Gill Century : शुभमन गिलचं आणखी एक शतक, 'या' मोठ्या विक्रमात बाबर आझमची बरोबरी

Jan 24, 2023, 07:18 PM IST

    • shubman gill century vs new zeland : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना इंदूर येथे खेळवला जात आहे. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमने सामने आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
shubman gill century vs new zeland

shubman gill century vs new zeland : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना इंदूर येथे खेळवला जात आहे. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमने सामने आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

    • shubman gill century vs new zeland : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना इंदूर येथे खेळवला जात आहे. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमने सामने आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

India Vs New Zealand 3rd ODI Match Today : इंदूर वनडे शुभमन गिलने शतक झळकावले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेतील शुभमनचे हे दुसरे शतक झळकावले आहे. पहिल्या सामन्यात त्याने द्विशतक झळकावले होते. गिलच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हे चौथे शतक ७२ चेंडूत झळकावले आहे. गिलने आतापर्यंत १३ चौकार आणि ४ षटकार मारले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

बाबरची बरोबरी

शुभमन गिलने या मालिकेत ३ सामन्यांच्या ३ डावात ३६० धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी १८०ची आहे. या मालिकेत शुभमन गिलने २ शतके झळकावली आणि यादरम्यान त्याने ३८ चौकार आणि १४ षटकारही ठोकले. शुभमन गिलने ३ एकदिवसीय सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत कोणत्याही फलंदाजाने सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

द्विपक्षीय वनडे मालिकेत सर्वाधिक धावा

• बाबर आझम ३६० विरुद्ध वेस्ट इंडीज, २०१६

• शुभमन गिल ३६० विरुद्ध न्यूझीलंड, २०२३

• इमरुल कायस ३४९ विरुद्ध झिम्बाब्वे २०१८

शुभमन गिलचे वनडे करिअर

सामने २१, डाव २१, १२५४ धावा

सरासरी ७३.७६, शतके- ४ अर्धशतके- ५

रोहित शर्माचंही शतक

दरम्यान, शुभमनच्या आधी कर्णधार रोहित शर्मानेही शानदार शतक झळकाले. तब्बल तीन वर्षांनंतर रोहितने आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. मात्र, शतकानंतर रोहित लगेच बाद झाला. २१२ धावांवर भारताची पहिली विकेट पडली. कर्णधार रोहितने ८५ चेंडूत १०१ धावा केल्या. त्याला मायकल ब्रेसवेलने क्लीन बोल्ड केले. रोहितच्या बॅटमधून ९ चौकार आणि ६ षटकार निघाले. शुभमन-रोहितने पहिल्या विकेटसाठी २६ षटकात २१२ धावा जोडल्या. 

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिलही लगेच बाद झाला. २३० धावांवर भारताची दुसरी विकेट पडली. शुभमन गिल ७८ चेंडूत ११२ धावा करून बाद झाला. ब्लेअर टिकनरने त्याला डेव्हन कॉनवेकरवी झेलबाद केले. गिलने १३ चौकार आणि ५ षटकार मारले. आता इशान किशन विराट कोहलीसोबत क्रीजवर आहे. हे वृत्त लिहिपर्यंत भारताची धावसंख्या २९ षटकांत २ बाद २३१ अशी आहे.