मराठी बातम्या  /  क्रीडा  /  VIDEO: आधी वेगवान चेंडूने बॅट तोडली, नंतर स्टम्प हवेत उडवले... बाबरविरुद्ध शाहीनचा कहर

VIDEO: आधी वेगवान चेंडूने बॅट तोडली, नंतर स्टम्प हवेत उडवले... बाबरविरुद्ध शाहीनचा कहर

Feb 27, 2023, 03:44 PM IST

    • PSL 2023: पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर आणि पेशावर झल्मी यांच्यात सामना झाला. या सामन्यात लाहोर कलंदर संघाने २० षटकात ३ गडी गमावून २४१ धावा ठोकल्या होत्या. 
PSL 2023

PSL 2023: पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर आणि पेशावर झल्मी यांच्यात सामना झाला. या सामन्यात लाहोर कलंदर संघाने २० षटकात ३ गडी गमावून २४१ धावा ठोकल्या होत्या.

    • PSL 2023: पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर आणि पेशावर झल्मी यांच्यात सामना झाला. या सामन्यात लाहोर कलंदर संघाने २० षटकात ३ गडी गमावून २४१ धावा ठोकल्या होत्या. 

shaheen afridi breaks bat : पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2023) शाहीन आफ्रिदीच्या लाहोर कलंदर आणि बाबर आझमच्या पेशावर झल्मी यांच्यात सामना झाला. या सामन्या लाहोर संघाचा कर्णधार शाहीन आफ्रिदीने चमकदार गोलंदाजी केली. या सामन्यात आफ्रिदीने ४ षटकात ४० धावा देत पेशावर झल्मीच्या अर्ध्या संघाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

या दरम्यान, शाहीनने त्याच्या चेंडूच्या वेगाने फलंदाजाची बॅट तोडली आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवर त्याने स्टंपही उडवले. या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

खरं तर, या सामन्यात, जेव्हा पेशावर झल्मीचा संघ २४२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा शाहीन आफ्रिदीच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पेशावरचा सलामीवीर मोहम्मद हॅरिसने समोरच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, त्यादरम्यान त्याची बॅट तुटली. यानंतर पुढच्याच चेंडूवर शाहीनने हॅरिसला बोल्ड करून स्टंपदेखील हवेत उडवले. शाहीनने एका अप्रतिम चेंडूवर पेशावरचा कर्णधार बाबर आझमचीही दांडी गुल केली.

या सामन्यात शाहीनने पेशावर झल्मीच्या ५ फलंदाजांची शिकार केली. लाहोर कलंदरच्या संघाने हा सामना ४० धावांनी जिंकला. हा त्यांचा या मोसमातील तिसरा विजय आहे.

फखर जमान आणि असद शफीक यांची अप्रतिम फलंदाजी

तत्पूर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लाहोर कलंदर संघाने २० षटकात ३ गडी गमावून २४१ धावा ठोकल्या होत्या. अवघ्या ७ धावांवर संघाची पहिली विकेट पडली, त्यानंतर फखर जमान आणि असद शफीक यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी पाहायला मिळाली. असदने या सामन्यात ४१ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावांची खेळी केली.

त्याचवेळी, फखर जमानने अवघ्या ४५ चेंडूत ९६ चोपल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १० षटकारांचा पाऊस पडला.