मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB vs MI Highlights : मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय, हीली मॅथ्यूज-सीव्हर ब्रंटने आरसीबीला धुतलं

RCB vs MI Highlights : मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय, हीली मॅथ्यूज-सीव्हर ब्रंटने आरसीबीला धुतलं

Mar 07, 2023, 10:34 AM IST

  • RCB W vs MI W Live Score : महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2023)  चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) ९ गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने मुंबईसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मुंबईने एक गडी गमावून लक्ष्य गाठले.

RCB W vs MI W Live Score

RCB W vs MI W Live Score : महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2023) चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) ९ गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने मुंबईसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मुंबईने एक गडी गमावून लक्ष्य गाठले.

  • RCB W vs MI W Live Score : महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2023)  चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) ९ गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने मुंबईसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मुंबईने एक गडी गमावून लक्ष्य गाठले.

WPL Cricket Score, RCB vs MI Women’s Premier League 2023 : महिला प्रीमियर लीगचा चौथा सामना आज (६ मार्च) मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ९ विकेट्सनी विजय मिळवला. हा मुंबईचा सलग दुसरा विजय आहे.

ट्रेंडिंग न्यूज

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

Vinesh Phogat : ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये विनेश फोगटचा राडा, कुस्तीच्या ट्रायल्स ३ तास थांबवल्या

RCB W vs MI W Score Updates

मुंबईचा सलग दुसरा विजय

मुंबईने आरसीबीचा नऊ गडी राखून पराभव केला आहे. १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई संघाने १४.२ षटकात १५९ धावा करत लक्ष्य गाठले. मुंबईकडून हिली मॅथ्यूजने सर्वाधिक नाबाद ७७ धावा केल्या. त्याचवेळी नॅट सीव्हरने ५५ धावांची नाबाद खेळी केली.

मॅथ्यूजने ३८ चेंडूत १३ चौकार आणि १ षटकार ठोकला तर सीव्हर ब्रंटने २९ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकार ठोकला.

हीली मॅथ्यूज आणि नॅट सीव्हर ब्रंट यांच्यात शतकी भागीदारी झाली. दोघींनी वेगाने धावा केल्या. 

RCB W vs MI W Live Score : हीली मॅथ्यूजचं अर्धशतक

हिली मॅथ्यूजने २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तिने आतापर्यंतच्या खेळीत ८ चौकार आणि १ षटकार मारला आहे. तिने आपल्या तुफानी फलंदाजीने मुंबईला चांगल्या स्थितीत आणले असून हा संघ सलग दुसऱ्या सामन्यात मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे.

RCB W vs MI W Live Score :  मॅथ्यूज आणि सिव्हरची शानदार फलंदाजी

हिली मॅथ्यूज आणि नॅट सिव्हर चांगल्या गतीने धावा काढत आहेत आणि समंजसपणे फलंदाजी करत आहेत. आठ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या एका विकेटवर ७६ अशी आहे. मॅथ्यूज ३८ आणि शिव्हर १५ धावांवर खेळत आहे.

RCB W vs MI W Live Score: मुंबई चांगल्या स्थितीत

मुंबईने ७ षटकानंतर १ बाद ६४ धावा केल्या आहेत. हेली मॅथ्यूज आणि नॅट सीव्हर क्रीजवर आहेत. मॅथ्यूज २० चेंडूत ३८ तर सीव्हर ब्रंट ३ धावांवर खेळत आहे.

RCB W vs MI W Live Score: मुंबईची पहिली विकेट पडली

४५ धावांवर मुंबईची पहिली विकेट पडली. यास्तिका भाटिया १९ चेंडूत २३ धावा करून बाद झाली. तिने आपल्या खेळीत ४ चौकार मारले. प्रिती बोसने तिला पायचीत केले. हीली मॅथ्यूजसह नॅट सिव्हर आता क्रीजवर आहे. 

RCB W vs MI W Live Score : मुंबईची शानदार सुरुवात

१५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली आहे. यास्तिका भाटिया आणि हीली मॅथ्यूजची जोडी चांगलीच टचमध्ये दिसत आहे आणि दोघीही वेगाने धावा करत आहेत. मुंबईने चार षटकांत एकही विकेट न गमावता ३४ धावा केल्या.

RCB W vs MI W Live Score : मुंबईची फलंदाजी सुरू

१५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची फलंदाजी सुरू झाली आहे. यस्तिका भाटिया आणि हीली मॅथ्यूज ही सलामीची जोडी क्रीझवर आहे. दोघीही वेगाने धावा करत आहेत. दोन षटक संपल्यानंतर मुंबईची धावसंख्या बिनबाद १५ धावा आहे.

RCB W vs MI W Live Score : मुंबईसमोर १५६ धावांचे लक्ष्य

अमेलिया केरने मेगन शुटला बाद करत आरसीबीचा डाव १५५ धावांत गुंडाळला. या सामन्यात स्मृती मानधनाचा संघ १८.४ षटकांत सर्वबाद झाला आणि पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. मेगन शुट १४ चेंडूत २० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. अमेलिया केरच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक यास्तिका भाटियाने तिला यष्टिचित केले. आता मुंबईसमोर विजयासाठी १५६ धावांचे लक्ष्य आहे.

आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीची सुरुवात चांगली झाली. सोफी डेव्हाईन आणि कर्णधार स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. मात्र, यानंतर संघ ४ धावांत ४ विकेट गमावून बॅकफूटवर आला. सायका इशाक आणि हीदर नाइट यांनी प्रत्येकी २ विकेट घेत सामन्यात मुंबईची पकड मजबूत केली.

मात्र, यानंतरही आरसीबीच्या फलंदाजांनी मोठे फटके खेळणे सुरूच ठेवले. रिचा घोष २६ चेंडूत २८, कनिका आहुजाने १३ चेंडूत २२, श्रेयंका पाटीलने १५  चेंडूत २३ धावा केल्या. अखेरीस, मेगन शुटने १४ चेंडूत २० धावा करत संघाची धावसंख्या १५० धावांच्या पुढे नेली.

मुंबईकडून हिली मॅथ्यूजने सर्वाधिक ३ बळी घेतले. त्याचवेळी सायका इशाक आणि अमेलिया केर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. नॅट सीव्हर आणि पूजा वस्त्राकरने प्रत्येकी १ गडी बाद केला.

RCB W vs MI W Live Score : आरसीबीची नववी विकेट पडली

१५४ धावांच्या स्कोअरवर आरसीबीची नववी विकेट पडली. अमेलिया केरने रेणुका सिंगला क्लीन बोल्ड करून आरसीबीला नववा धक्का दिला आहे. रेणुका सिंगने पाच चेंडूत २ धावा केल्या.

RCB W vs MI W Live Score : आरसीबीची धावसंख्या १५० च्या पुढे

आरसीबीची धावसंख्या ८ बाद १५० च्या पुढे गेली आहे. मेगन शुट आणि रेणुका सिंग क्रीजवर आहेत. दोघींचाही वेगाने धावा करून आरसीबीला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. या खेळपट्टीवर १७० धावांचे लक्ष्य आव्हानात्मक असेल.

RCB W vs MI W Live Score : आरसीबी १०० च्या पुढे

बंगळुरूच्या धावसंख्येने १०० धावांचा टप्पा ओलांडल्या आहे. रिचा घोष आणि कनिका घोष यांनी चांगली भागीदारी करत आपल्या संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवले आहे. आता अखेरच्या ८ षटकात वेगाने धावा करत बंगळुरूला चांगली धावसंख्या गाठण्याची संधी आहे. बंगळुरूची धावसंख्या १२ षटकांत ५ बाद १०२ अशी आहे.

RCB W vs MI W Live Score : बंगळुरूला पहिला धक्का

बंगळुरूची पहिली विकेट 39 धावांच्या स्कोअरवर पडली. सोफी डिव्हाईन १० चेंडूत १६ धावा करून बाद झाली.

RCB W vs MI W Live Score : आरसीबीची चांगली सुरूवात

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरू संघाने चांगली सुरुवात केली आहे. बंगळुरूची धावसंख्या ४ षटकानंतर ३५ धावा झाल्या आहेत.

RCB W vs MI W Live Score: आरसीबीची फलंदाजी सरू

बंगळुरूची फलंदाजी सुरू झाली आहे. कर्णधार स्मृती मानधना आणि सोफी डिव्हाईन क्रीजवर आहेत. पहिले षटक संपल्यानंतर बंगळुरूची धावसंख्या ११ धावा आहे.

RCB W vs MI W Live Score : दोन्ही प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स : यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हिली मॅथ्यूज, नॅट शिव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इसी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता, सायका इशाक.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, दिशा कसाट, रिचा घोष (विकेटकीपर), हीदर नाइट, कनिका आहुजा, मेगन शुट, श्रेयंका पाटील, प्रीती बोस, रेणुका सिंग.

RCB W vs MI W Live Score : आरसीबीचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळुरू संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. त्याचबरोबर मुंबई संघात कोणताही बदल झालेला नाही.