मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni : चाहत्यानं लग्नपत्रिकेवर छापले धोनीचे फोटो, माहीसारखी क्रेझ कुणाचीच नाही! पाहा

MS Dhoni : चाहत्यानं लग्नपत्रिकेवर छापले धोनीचे फोटो, माहीसारखी क्रेझ कुणाचीच नाही! पाहा

Jun 03, 2023, 07:31 PM IST

    • fan prints ms dhoni photos on wedding card : सोशल मीडियावर व्हायरल झालेली लग्नपत्रिका छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील आहे. वास्तविक, या लग्नपत्रिकेच्या दोन्ही बाजूला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे फोटो आहेत.
fan prints ms dhoni photos on wedding card

fan prints ms dhoni photos on wedding card : सोशल मीडियावर व्हायरल झालेली लग्नपत्रिका छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील आहे. वास्तविक, या लग्नपत्रिकेच्या दोन्ही बाजूला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे फोटो आहेत.

    • fan prints ms dhoni photos on wedding card : सोशल मीडियावर व्हायरल झालेली लग्नपत्रिका छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील आहे. वास्तविक, या लग्नपत्रिकेच्या दोन्ही बाजूला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे फोटो आहेत.

आयपीएल 2023 चा हंगाम संपला आहे. जवळपास दोन महिने चाललेल्या या क्रिकेटच्या महाकुंभात ७४ सामने खेळले गेले. महेंद्रसिंह धोनीच्या (ms dhoni) तृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने (CSK) २९ मे (सोमवार) रोजी गुजरात टायटन्सचा (GT) ५ विकेट्सने पराभव करून पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

ट्रेंडिंग न्यूज

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

Vinesh Phogat : ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये विनेश फोगटचा राडा, कुस्तीच्या ट्रायल्स ३ तास थांबवल्या

लग्नपत्रिकेवर धोनीचे फोटो

या दरम्यान, सोशल मीडियावर एक लग्नपत्रिका तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेली लग्नपत्रिका छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील आहे. विशेष म्हणजे, या लग्नपत्रिकेच्या दोन्ही बाजूला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे फोटो आहेत. याशिवाय धोनीचा जर्सी क्रमांक ७ हा देखील छापण्यात आला आहे.

धोनीच्या या जबरा चाहत्याचे नाव दीपक पटेल आहे. तो मिलुपारा येथील कोंडकेल जिल्ह्यातील रहिवासी आहे. दीपक पटेल हा धोनीचा खूप मोठा चाहता आहे.

लहानपणापासून धोनी आदर्श

दीपक पटेल सांगतो की, तो लहानपणापासून तो महेंद्रसिंह धोनीला आपला आदर्श मानतो, धोनीमुळेच त्याला क्रिकेटमध्ये खूप रस आहे. धोनीमुळेच त्याने क्रिकेट पाहायला सुरुवात केली. तसेच तो म्हणतो की, “ तो त्याच्या गावातील क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. महेंद्रसिंह धोनीकडून त्याने कॅप्टन्सी शिकली आहे. दीपक पटेलने पुढे सांगितले की, त्याने हे केवळ लोकप्रियतेसाठी केले नाही, तर त्याला कॅप्टन कूल मनापासून आवडतो”.

सर्वात यशस्वी कर्णधार

दरम्यान, महेंद्रसिंग धोनीची गणना आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. याशिवाय महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०११ साली एकदिवसीय विश्वचषक आणि २००७ साली T20 विश्वचषक जिंकला आहे. तसेच, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.