मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MI Vs GT Highlights : गुजरातचा २७ धावांनी पराभव, राशीद खाननं ठोकले १० षटकार

MI Vs GT Highlights : गुजरातचा २७ धावांनी पराभव, राशीद खाननं ठोकले १० षटकार

May 12, 2023, 07:03 PM IST

    • MI Vs GT IPL Score : आयपीएल 2023 चा ५७वा सामना आज (१२ एप्रिल) मुंबई (MI) आणि गुजरात (GT) यांच्यात झाला. या सामन्यात गुजरातचा २७ धावांनी पराभव झाला.
MI Vs GT IPL Live Score

MI Vs GT IPL Score : आयपीएल 2023 चा ५७वा सामना आज (१२ एप्रिल) मुंबई (MI) आणि गुजरात (GT) यांच्यात झाला. या सामन्यात गुजरातचा २७ धावांनी पराभव झाला.

    • MI Vs GT IPL Score : आयपीएल 2023 चा ५७वा सामना आज (१२ एप्रिल) मुंबई (MI) आणि गुजरात (GT) यांच्यात झाला. या सामन्यात गुजरातचा २७ धावांनी पराभव झाला.

IPL Cricket Score, MI vs GT Indian Premier League 2023 : IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा २७ धावांनी पराभव करत सातवा विजय नोंदवला. या विजयासह हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २१८ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ केवळ १९१ धावा करू शकला आणि सामना २७ धावांनी गमावला.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

MI Vs GT IPL  Score updates

मुंबईचा शानदार विजय

आयपील 2023 च्या ५७व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने आज (१२ एप्रिल) गुजरात टायटन्सचा २७ धावांनी पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरातला विजयासाठी २१९ धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याचा संघ आठ गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावाच करू शकला.

गुजरातकडून राशिद खानने अवघ्या ३२ चेंडूंत नाबाद ७९ धावा केल्या, ज्यात १० षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता.

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांचे ५५ धावांतच पाच गडी तंबूत परतले होते. फॉर्मात असलेले सलामीवीर रिद्धिमान साहा (२) आणि शुभमन गिल (६) यांना आकाश मधवालने बाद केले. त्याचवेळी कर्णधार हार्दिक पांड्याला (४) जेसन बेहरेनडॉर्फने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. विजय शंकरने (२९) सहा चौकार मारले, पण अनुभवी फिरकीपटू पियुष चावलाने उत्कृष्ट चेंडूवर त्याला बोल्ड केले. यानंतर अभिनव मनोहरला कुमार कार्तिकेयने बोल्ड केले, त्याला फक्त २ धावा करता आल्या.

५ विकेट पडल्यानंतर डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांनी ४५ धावांची भागीदारी केली. आकाश मधवालने डेव्हिड मिलरला बाद करून ही भागीदारी तोडली. मिलरने २६ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या. मिलर बाद झाल्यानंतर लगेचच राहुल तेवतियाही पियुष चावलाच्या चेंडूवर बाद झाला.

राशीद खानची झंझावाती फलंदाजी

१०३ धावांवर आठवी विकेट पडल्यानंतर गुजरात टायटन्स संघ १२५ धावाही करू शकणार नाही असे वाटत होते. मात्र अफगाणिस्तानचा खेळाडू राशिद खानने तुफानी खेळी करत गुजरात टायटन्सला मोठ्या पराभवापासून वाचवले. राशिदने आयपीएल कारकिर्दीत पहिले अर्धशतक झळकावले. राशिद खान आणि अल्झारी जोसेफ (७) यांच्यात नवव्या विकेटसाठी ८८ धावांची नाबाद भागीदारी झाली.

मुंबईचा डाव

मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगलीच धमाकेदार झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन यांनी ६.१ षटकात ६१ धावांची भागीदारी केली. रोहितने १८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह २९ धावा केल्या. त्याचवेळी इशानने चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३१ धावा केल्या. फिरकी गोलंदाज राशिद खानने एकाच षटकात दोन्ही खेळाडूंना बाद केले. रशीदने नेहल वढेरालाही तंबूत पाठवले. त्यामुळे मुंबईची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ८८ धावा झाली.

सुर्याची तुफान फटकेबाजी

येथून सूर्यकुमार यादव आणि विष्णू विनोद यांनी ६५ धावांची भागीदारी करत मुंबईला १५० धावांच्या पुढे नेले. विष्णू विनोदने दोन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने ३० धावा केल्या. विनोद बाद झाल्याचा सूर्यावर काहीही परिणाम झाला नाही आणि त्याची झंझावाती फलंदाजी सुरूच राहिली. सूर्याने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. सूर्याने ४९ चेंडूंत ११ चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद १०३ धावा केल्या.

MI Vs GT Live Score : गुजरातची आठवी विकेट पडली

१०३ धावांवर गुजरात संघाची आठवी विकेट पडली. नूर अहमद तीन चेंडूत एक धाव घेऊन बाद झाला आहे. कुमार कार्तिकेयने त्याला क्लीन बोल्ड केले. आता रशीद खान आणि अल्झारी जोसेफ क्रीजवर आहेत. मुंबईचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. गुजरातची धावसंख्या १५ षटकांत आठ बाद १३० अशी आहे.

MI Vs GT Live Score : गुजरातला दुसरा धक्का

१२ धावांवर गुजरात संघाची दुसरी विकेट पडली. कर्णधार हार्दिक पंड्या तीन चेंडूत चार धावा करून बाद झाला आहे. जेसन बेहरेनडॉर्फने त्याला यष्टिरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केले. आता विजय शंकर गिलसोबत क्रीजवर आहे. तीन षटकांनंतर गुजरातची धावसंख्या दोन बाद १७ धावा आहे.

MI Vs GT Live Score : मुंबई इंडियन्सच्या २१८ धावा

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने ५ विकेट गमावत २१८ धावा केल्या आहेत. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक १०३ धावांची खेळी केली. डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने आपले शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ६ षटकार मारले. सूर्याशिवाय ईशान किशन, विष्णू विनोद आणि रोहित शर्मा यांनीही मुंबईसाठी उपयुक्त खेळी खेळली.

MI Vs GT Live Score : विष्णु विनोद बाद

१५३ धावांवर मुंबई इंडियन्सची चौथी विकेट पडली. विष्णू विनोद २० चेंडूत ३० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. मोहित शर्माच्या चेंडूवर अभिनव मनोहरने त्याचा झेल टिपला.

MI Vs GT Live Score : मुंबईची तिसरी विकेट पडली

८८ धावांवर मुंबई इंडियन्सची तिसरी विकेट पडली. नेहल वढेरा सात चेंडूत १५ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या डावात एक चौकार आणि एक षटकार ठोकला.  रशीद खानने बोल्ड केले. आता विष्णू विनोद सूर्यकुमार यादवसोबत क्रीजवर आहे. मुंबईची धावसंख्या १० षटकांनंतर ३ बाद ९६ अशी आहे.

MI Vs GT Live Score : रोहित शर्मा बाद

६१ धावांवर मुंबई इंडियन्सची पहिली विकेट पडली. कर्णधार रोहित शर्मा १८ चेंडूत २९ धावा करून बाद झाला आहे. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले. रशीद खानने त्याला स्लिपमध्ये राहुल तेवतियाकरवी झेलबाद केले.

MI Vs GT Live Score : पॉवरप्लेमध्ये बिनबाद ६१ धावा

मुंबई इंडियन्सने पॉवरप्लेमध्ये बिनबाद ६१ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा १७ चेंडूत २९ तर इशान किशन १८ चेंडूत ३१ धावांवर खेळत आहेत.

MI Vs GT Live Score : दोन्ही संघ 

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, नूर अहमद

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय

MI Vs GT Live Score : मुंबईची प्रथम फलंदाजी

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वानखेडे मैदानावर पाठलाग करणे सोपे आहे. याच कारणामुळे हार्दिकने हा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात कोणताही बदल झालेला नाही.