मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MI Vs RCB Highlights : वानखेडेत सूर्याचं वादळ, आरसीबीला हरवून मुंबई इंडियन्स टॉप-३ मध्ये

MI Vs RCB Highlights : वानखेडेत सूर्याचं वादळ, आरसीबीला हरवून मुंबई इंडियन्स टॉप-३ मध्ये

May 09, 2023, 11:17 PM IST

    • MI Vs RCB ipl 2023 highlights : आयपीएलच्या ५४व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बंगळुरूचा ६ गडी राखून पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने मुंबईला २०० धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी सहज गाठले. या विजयासह मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
MI Vs RCB ipl 2023 highlights

MI Vs RCB ipl 2023 highlights : आयपीएलच्या ५४व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बंगळुरूचा ६ गडी राखून पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने मुंबईला २०० धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी सहज गाठले. या विजयासह मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

    • MI Vs RCB ipl 2023 highlights : आयपीएलच्या ५४व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बंगळुरूचा ६ गडी राखून पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने मुंबईला २०० धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी सहज गाठले. या विजयासह मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

MI Vs RCB ipl 2023 highlights : आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ६ विकेट्सने धुव्वा उडवला आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने मुंबईला २०० धावांचे लक्ष्य दिले होते, जे यजमानांनी १७व्या षटकात पूर्ण केले. मुंबईच्या विजयाचा हिरो सूर्यकुमार यादव ठरला. त्याने ३५ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. यादरम्यान सूर्याने ७ चौकार आणि ६ षटकार मारले.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

या सामन्यातील विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

तत्पूर्वी, लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशनने मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली. इशान किशनने अवघ्या २१ चेंडूंत ४ चौकार आणि षटकारांसह ४२ धावा केल्या. आपल्या झंझावाती खेळीदरम्यान इशानने रोहित शर्मासोबत ५१ धावांची भागीदारी केली. ५व्या षटकात वानिंदू हसरंगाने इशानला यष्टिरक्षक अनुज रावतकरवी झेलबाद केले. हसरंगाने त्याच षटकात रोहितलाही एलबीडब्ल्यू केले, त्याला केवळ ७ धावा करता आल्या.

आरसीबीचा डाव

नाणेफेक हारल्यानंतर आरसीबी प्रथम फलंदाजीला उतरला आणि त्याची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या पाचव्या चेंडूवर जेसन बेहरेनडॉर्फने विराट कोहलीला (१ धाव) यष्टिरक्षक इशान किशनकडे झेलबाद केले. यानंतर त्याच्या पुढच्या षटकात या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने अनुज रावतलाही तंबूत पाठवले. ६ धावा करणाऱ्या रावतने कॅमेरून ग्रीनकडे कॅच सोपवला.

१६ धावांत दोन विकेट पडल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस यांनी १२० धावांची धडाकेबाज भागीदारी करून आरसीबीला मजबूत स्थितीत नेले. मॅक्सवेलने ३३ चेंडूत ६८ धावांची खेळी केली, ज्यात ८ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. जेसन बेहरेनडॉर्फने मॅक्सवेलला नेहल वढेराकडे झेलबाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर काही वेळातच महिपाल लोमरोर (१) आणि फाफ डू प्लेसिसही पॅव्हेलियनमध्ये परतले.

डु प्लेसिसने ४१ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने पाच चौकार आणि तीन षटकार मारले. डू प्लेसिस पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर, फॉर्ममध्ये नसलेल्या दिनेश कार्तिकने काही जोरदार फटके मारून आरसीबीला २०० धावांच्या जवळ पोहोचण्यास मदत केली. कार्तिकने ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३० धावा केल्या. वनिंदू हसरंगा आणि केदार जाधव या दोघांनी १२ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फने ३ विकेट घेतल्या.