मराठी बातम्या  /  क्रीडा  /  भारतीय फलंदाज म्हणतो, मला तेव्हा वाटलं माझ्याऐवजी संजू सॅमसनने खेळावं

भारतीय फलंदाज म्हणतो, मला तेव्हा वाटलं माझ्याऐवजी संजू सॅमसनने खेळावं

Nov 24, 2022, 12:45 PM IST

    • सध्या संजू सॅमसनसुद्धा संघातून बाहेर आहे. संजू सॅमसनला न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेतही खेळण्याची संधी मिळाली नाही.
भारतीय फलंदाज म्हणतो, मला तेव्हा वाटलं माझ्याऐवजी संजू सॅमसनने खेळावं

सध्या संजू सॅमसनसुद्धा संघातून बाहेर आहे. संजू सॅमसनला न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेतही खेळण्याची संधी मिळाली नाही.

    • सध्या संजू सॅमसनसुद्धा संघातून बाहेर आहे. संजू सॅमसनला न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेतही खेळण्याची संधी मिळाली नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१५ मध्ये मनिष पांडेने पदार्पण केलं होतं. त्यानंतर पाच वर्षे तो भारताच्या एकदिवसीय आणि टी२० संघात खेळला. यात तो २९ एकदिवसीय आणि ३९ टी२० सामने खेळू शकला. यावेळी त्याला कधी ३ नंबरवर फलंदाजी करण्याची संधीही मिळाली. गेल्या दोन तीन वर्षांत टी२० क्रिकेटमध्ये वेगाने बदल झाला आणि मनिष पांडेनं संघातलं आपलं स्थान गमावलं. आता त्याने म्हटलं आहे की, माझ्या जागी संजू सॅमसनने खेळायला पाहिजे होतं.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

मनिष पांडेने म्हटलं की, मला जास्त सामने खेळायला आवडत होतं पण माहिती होतं की संजू सॅमसन सारख्या खेळाडूंना संधी द्यायला हवी. संजू सॅमसन तेव्हा चांगली फलंदाजी करत होता आणि मला वाटलं की आता त्याला आणखी सामने खेळायला हवेत आणि त्याने खेळले. त्यामुळे तिथे काही वेगळी भावना नाही. माझ्याबद्दल सांगायचं तर मला आणखी सामने खेळायची इच्छा आहे आणि स्वत:ला सिद्ध करायचे आहे पण दुर्दैवाने असं होऊ शकलं नाही.

मनिष पांडे पुढे म्हणाला की, भारतीय संघासोबत मीसुद्धा त्या स्थितीतून गेलो आहे. अनेकदा असं झालं की खूप सामने न खेळता मी बाहेर बसलो. याबद्दल थोडं वाईट वाटतं पण हे सगळं खेळाच्या भावनेतून होतं. संघाला जिथे ज्या गोष्टीची गरज आहे ती सर्वांना मान्य करावी लागते. आता मला वर्तमानात रहायचं आहे. जर मला संधी मिळाली तर मी खेळेन आणि चांगल्या धावाही काढेन.

सध्या संजू सॅमसनसुद्धा संघातून बाहेर आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असलेल्या संजू सॅमसनला न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेतही खेळण्याची संधी मिळाली नाही. विजय हजारे ट्रॉफीत कर्नाटकसाठी खेळताना पुनरागमन करण्यासाठी धडपडणाऱ्या मनिष पांडेला चांगला सूर गवसलेला नाही. तर २०२३ च्या आयपीएल आधी लखनऊ सुपर जायंट्सने त्याला रिलीजसुद्धा केलं आहे.

विभाग