मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs WI : रोहित-पंतची वेस्ट इंडिजमध्ये धमाकेदार एन्ट्री, पाहा व्हिडीओqs

IND vs WI : रोहित-पंतची वेस्ट इंडिजमध्ये धमाकेदार एन्ट्री, पाहा व्हिडीओqs

Jul 26, 2022, 03:11 PM IST

    • भारताचा T20 संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर (India vs West Indies)  पोहोचला आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) आणि यष्टिरक्षक रिषभ पंतसह सर्व खेळाडू त्रिनिदादला पोहोचले आहेत. भारताचा वनडे संघ आधीच वेस्ट इंडिजमध्ये आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून मालिका २-० अशी जिंकली आहे.
IND vs WI

भारताचा T20 संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर (India vs West Indies) पोहोचला आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) आणि यष्टिरक्षक रिषभ पंतसह सर्व खेळाडू त्रिनिदादला पोहोचले आहेत. भारताचा वनडे संघ आधीच वेस्ट इंडिजमध्ये आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून मालिका २-० अशी जिंकली आहे.

    • भारताचा T20 संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर (India vs West Indies)  पोहोचला आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) आणि यष्टिरक्षक रिषभ पंतसह सर्व खेळाडू त्रिनिदादला पोहोचले आहेत. भारताचा वनडे संघ आधीच वेस्ट इंडिजमध्ये आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून मालिका २-० अशी जिंकली आहे.

India vs West Indies: टीम इंडिायाचा कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टिरक्षक रिषभ पंतसह भारताचे वरिष्ठ खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये आहेत. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात ५ सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी माजी कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

भारताचा वनडे संघ आधीच वेस्ट इंडिजमध्ये आहे. या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून मालिका २-० अशी जिंकली आहे. तर तिसरा सामना २७ जुलै रोजी होणार आहे.

टीम इंडिया त्रिनिदादला पोहोचल्याचा एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये कर्णधार रोहित आणि इतर भारतीय खेळाडूंची धमाकेदार एन्ट्री दिसत आहे. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी खेळाडूंचे स्वागत केले. दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादवही व्हिडीओत दिसत आहेत.

यानंतर ५ सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना २९ जुलै रोजी होणार आहे. या मालिकेत कोहली-बुमराहशिवाय लेगस्पिनर युजवेंद्र चहललाही विश्रांती देण्यात आली आहे. फिरकीपटू म्हणून संघात रवी बिश्नोई, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचा समावेश करण्यात आला आहे. शस्त्रक्रियेनंतर केएल राहुलला संधी मिळाली आहे. मात्र, राहुल आणि कुलदीपला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे.

टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया-

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान. , हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

वेस्ट इंडिज विरुद्ध टी-20 मालिकेचे वेळापत्रक-

पहिला T20 - २९ जुलै (त्रिनिदाद)

दुसरा टी२०- १ ऑगस्ट (सेंट किट्स)

तिसरा T20 - २ ऑगस्ट (सेंट किट्स)

चौथा T20 - ६ ऑगस्ट लॉडरहिल, फ्लोरिडा

पाचवा T20- ७ ऑगस्ट लॉडरहिल, फ्लोरिडा.