मराठी बातम्या  /  क्रीडा  /  हे वागणं बरं नव्हं! ऋतुराज गायकवाडचं लाजिरवाणं कृत्य, सोशल मीडियावर छी-थू

हे वागणं बरं नव्हं! ऋतुराज गायकवाडचं लाजिरवाणं कृत्य, सोशल मीडियावर छी-थू

Jun 20, 2022, 02:15 PM IST

    • ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) ग्राऊंड्स्मनसोबतच्या अशा वागणुकीनंतर सोशल मीडियावर तो प्रचंड ट्रोल होत आहे.
ruturaj gaikwad (hindustan)

ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) ग्राऊंड्स्मनसोबतच्या अशा वागणुकीनंतर सोशल मीडियावर तो प्रचंड ट्रोल होत आहे.

    • ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) ग्राऊंड्स्मनसोबतच्या अशा वागणुकीनंतर सोशल मीडियावर तो प्रचंड ट्रोल होत आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (india vs south africa t20 series) यांच्यातील ५ सामन्यांची T20I मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. मालिकेतील शेवटचा सामना बंगळुरूमध्ये खेळवला जाणार होता, मात्र पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

टीम इंडियाने ३.३ षटकात २ गडी गमावून २८ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस सुरु झाला आणि खेळ सुरू होऊ शकला नाही.

सामन्यादरम्यान ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्याशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक ग्राउंड्समन डगआऊटमध्ये बसलेल्या ऋतुराजसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण ऋतुराज गायकवाड आपल्या हातांच्या मदतीने त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, पण ग्राउंड्समन सेल्फी घेण्याचा प्रयत्न सुरूच ठेवतो. ऋतुराजचे हे वागणे क्रिकेट चाहत्यांना पटलेले नाही. त्यांनी सोशल मीडियावर याबद्दल नाराजी व्यक्त केली. व्हिडिओ पाहून क्रिकेटप्रेमींनी गायकवाडला ट्रोल केले आहे.

दरम्यान, सामन्यात भारतीय कर्णधार रिषभ पंतने यावेळीही नाणेफेकीचा कौल गमावला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली नाही. पावसामुळे सामना रद्द होण्यापूर्वी भारताने ३.३ षटकात २ बाद २८ धावा केल्या होत्या. यादरम्यान सलामीवीर इशान किशनने ७ चेंडूत १५ धावा केल्या. त्याने २ षटकारही मारले. तर ऋतुराज गायकवाड १० धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यर खाते न उघडता नाबाद राहिला. तर रिषभ पंत एका धावेवर नाबाद राहिला. त्यानंतर पावसाची संततधार सुरूच होती. त्यामुळे सामना होऊ शकला नाही. मालिका २-२ अशी बरोबरीत संपली.