मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind Vs Nz 3rd T20 : निर्णायक सामन्यात पृथ्वी शॉ खेळणार? असा असू शकतो भारताचा संघ, जाणून घ्या

Ind Vs Nz 3rd T20 : निर्णायक सामन्यात पृथ्वी शॉ खेळणार? असा असू शकतो भारताचा संघ, जाणून घ्या

Feb 01, 2023, 10:32 AM IST

    • india vs new zealand 3rd t20 playing 11 : टी-२० मालिकेच्या दृष्टीने आजचा सामना खूप महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांना अहमदाबादमधील सामना जिंकून मालिका खिशात घालायची आहे. अशा स्थितीत दोन्ही संघात (Ind Vs Nz 3rd T20 Playing 11) बदल होण्याची शक्यता कमीच आहे. पण, भारताची फ्लॉप टॉप ऑर्डरमध्ये एक बदल केला जाऊ शकतो. 
Ind Vs Nz 3rd T20 Playing 11

india vs new zealand 3rd t20 playing 11 : टी-२० मालिकेच्या दृष्टीने आजचा सामना खूप महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांना अहमदाबादमधील सामना जिंकून मालिका खिशात घालायची आहे. अशा स्थितीत दोन्ही संघात (Ind Vs Nz 3rd T20 Playing 11) बदल होण्याची शक्यता कमीच आहे. पण, भारताची फ्लॉप टॉप ऑर्डरमध्ये एक बदल केला जाऊ शकतो.

    • india vs new zealand 3rd t20 playing 11 : टी-२० मालिकेच्या दृष्टीने आजचा सामना खूप महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांना अहमदाबादमधील सामना जिंकून मालिका खिशात घालायची आहे. अशा स्थितीत दोन्ही संघात (Ind Vs Nz 3rd T20 Playing 11) बदल होण्याची शक्यता कमीच आहे. पण, भारताची फ्लॉप टॉप ऑर्डरमध्ये एक बदल केला जाऊ शकतो. 

india vs new zealand 3rd t20 match preview : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा टी-२० सामना आज (१ फेब्रुवारी) बुधवारी अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत असून मालिकेच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

त्यामुळे सर्वांच्या नजरा भारताच्या प्लेइंग-११ वर असणार आहेतत. कारण शुभमन गिल आणि इशान किशन ही सलामीची जोडी या मालिकेत फ्लॉप ठरली आहे. अशा परिस्थितीत पृथ्वी शॉला आज संधी द्यावी, अशी सर्वांची मागणी आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत धावा करत पृथ्वी शॉने टीम इंडियात पुनरागमन केले आहे, परंतु प्लेइंग-११ मध्ये त्याला स्थान मिळवता आलेले नाही.

कर्णधार हार्दिक पांड्या आज प्लेइंग-११ मध्ये बदल करेल आणि खराब फॉर्ममध्ये झगडत असलेल्या इशान किंवा शुभमनला बाहेर बसवेल, अशी शक्यता आहे.

अर्शदीप सिंग हादेखील गेले दोन्ही सामने विशेष काही करू शकला नाही. तो चांगलाच महागडा ठरला आहे. अर्शदीपने या मालिकेतील २ सामन्यात ३ विकेट घेतल्या आहेत. पण त्याने ९.६६ च्या इकॉनॉमीने धावा वाटल्या आहेत.

तिसर्‍या T20 साठी दोन्ही संंभाव्य संघ

भारताची प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल, पृथ्वी शॉ / इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, शिवम मावी, अर्शदीप सिंग

न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन- फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डिरेल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, ईश सोधी, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर