मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs NZ 3rd T20: न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक सामन्यात 'या' तीन खेळाडूंवर राहणार सर्वांची नजर

IND vs NZ 3rd T20: न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक सामन्यात 'या' तीन खेळाडूंवर राहणार सर्वांची नजर

Jan 31, 2023, 04:42 PM IST

  • India vs New Zealand T20 Series: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताच्या वरच्या फळतील फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.

Team India

India vs New Zealand T20 Series: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताच्या वरच्या फळतील फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.

  • India vs New Zealand T20 Series: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताच्या वरच्या फळतील फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.

India vs New Zealand 3rd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा टी-२० सामना बुधवारी अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. दरम्यान, दोन्ही टी-२० सामन्यात भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजाला काही खास कामगिरी करता आली नाही. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत शुभमन गिल, ईशान किशन आणि राहुल त्रिपाठीला टी-२० मालिकेत संधी देण्यात आली. मात्र, या तिघांनाही मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यानंतर भारतीय संघ दिर्घकाळ आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट खेळणार नाही. यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी खेळाडूंकडे छाप सोडण्याची शेवटची संधी असेल. बांगलादेश दौऱ्यात दुहेरी शतक झळकावणारा ईशान किशनला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत आपला फॉर्म कायम ठेवता आला नाही. तर, शुभमन गिल न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर संघर्ष करताना दिसला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघात स्थान मिळालेल्या राहुल त्रिपाठीच्या पदरातही निराशा पडली.

सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पांड्याच्या संयमी खेळीच्या जोरावर भारताला या मालिकेतील दुसरा आणि महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवता आला. २० षटकात अवघ्या १०० धावांचे लक्ष्य गाठताना भारताच्या नाकी नऊ आले. यामुळे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णयाक सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी बजावतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विभाग

पुढील बातम्या