मराठी बातम्या  /  क्रीडा  /  kieron pollard : धडाकेबाज कायरन पोलार्डनं स्टेडियमच्या बाहेर सिक्सर मारला आणि…

kieron pollard : धडाकेबाज कायरन पोलार्डनं स्टेडियमच्या बाहेर सिक्सर मारला आणि…

Jan 31, 2023, 11:56 AM IST

  • kieron pollard in uae t20 league 2023 : यूएईमध्ये सुरू असलेल्या टी-२० लीगमध्ये रविवारी कायरन पोलार्डनं उत्तुंग षटकार ठोकल्यानंतर एक भन्नाट किस्सा घडला.

kieron pollard

kieron pollard in uae t20 league 2023 : यूएईमध्ये सुरू असलेल्या टी-२० लीगमध्ये रविवारी कायरन पोलार्डनं उत्तुंग षटकार ठोकल्यानंतर एक भन्नाट किस्सा घडला.

  • kieron pollard in uae t20 league 2023 : यूएईमध्ये सुरू असलेल्या टी-२० लीगमध्ये रविवारी कायरन पोलार्डनं उत्तुंग षटकार ठोकल्यानंतर एक भन्नाट किस्सा घडला.

kieron pollard in uae t20 league 2023 : संयुक्त अरब अमिरातीमध्ये (AUE) सध्या आंतरराष्ट्रीय लीग T20 स्पर्धा सुरू आहे. आयपीएल इतकी नसली तरी या स्पर्धेची लोकप्रियता हळूहळू वाढत असून मैदानावर व मैदानाबाहेर अनेक मजेशीर किस्सेही पाहायला मिळत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

एमआय एमिरेट्सचा ने रविवारी अवघ्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ILT20 मध्ये विक्रमी २४१ धावा केल्या. शारजाच्या छोट्या मैदानावर कायरन पोलार्ड, महंमद वसीम आणि आंद्रे फ्लेचर यांनी दमदार अर्धशतके झळकावली.

एमआय एमिरेट्सचा कर्णधार कायरन पोलार्डनं १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. ही खेळी साकारताना चार चौकार आणि चार षटकार लगावले. पोलार्डचा धडाका सुरू असताना एक विचित्र घटनाही घडली. डॅन मोस्लीनं एक चेंडू स्टेडियमच्या बाहेर भिरकावून दिला. हा चेंडू एका माणसाला लागून रस्त्यावर पडला. तो माणूस चेंडू घेऊन थेट पळून गेला.

मोस्लीच्या पाठोपाठ पोलार्डनंही एका उत्तुंग षटकार मैदानाच्या बाहेर भिरकावून दिला. पुन्हा चेंडू रस्त्यावर जाऊन पडला. एक माणूस चेंडूजवळ आला आणि त्यानं पुन्हा चेंडू स्टेडियमच्या आत फेकला.

एमआय एमिरेट्सनं स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारण्याबरोबरच स्पर्धेतील सर्वात मोठ्या विजयाचीही नोंद केली. एमआयनं डेझर्ट वायपर्सचा १५७ धावांच्या फरकानं मोठा पराभव केला. या मैदानावरील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.

विभाग

पुढील बातम्या