मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rishabh Pant Health Update : ऋषभ पंतला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार?, आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता

Rishabh Pant Health Update : ऋषभ पंतला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार?, आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 31, 2023 12:13 AM IST

Rishabh Pant Health Update : गेल्या महिन्याभराच्या काळात ऋषभ पंतच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली असून तो लवकरच क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे.

Rishabh Pant Health Update
Rishabh Pant Health Update (ANI)

Rishabh Pant Health News : दिल्लीतील कार्यक्रम आटोपून आईला भेटण्यासाठी उत्तराखंडच्या रुडकी जात असताना कार अपघातात गंभीर जखमी झालेला टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याच्या प्रकृतीबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. पंतवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात बीसीसीआयच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. परंतु आता गेल्या महिनाभरापासून मुंबईत उपचार घेतल्यानंतर आता ऋषभ पंतला त्याच्या घरी पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयातून पंतला डिस्चार्ज मिळणार असल्यामुळं आता तो आगामी आयपीएल स्पर्धेत खेळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

कार अपघातात गंभीर मार लागल्यानंतर आता ऋषभ पंतच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. आतापर्यंत पंतवर करण्यात आलेल्या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून या आठवड्यात त्याला रुग्णालयातून त्याच्या उत्तराखंडमधील घरी शिफ्ट केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघात झाल्यानंतर पंतवर रुडकी, दिल्ली आणि त्यानंतर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात ऋषभ पंतवर उपचार करण्यात आलेले आहेत. त्यामुळं आता ऋषभ पंतची क्रिकेटच्या मैदानावर कधी पुनरागमन होणार?, याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतला पूर्णपणे ठीक होण्यास अजून काही महिने लागणार असून त्याच्या गुडघ्यावर आणखी एक ऑपरेशन होणार आहे. त्यामुळं आता गुडघ्यावरील ऑपरेशन करण्यात आल्यानंतर फिट होऊन ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.

WhatsApp channel