मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shafali Verma : अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये खेळली १९ वर्षे होऊन गेलेली शेफाली वर्मा; कसं झाले हे शक्य?

Shafali Verma : अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये खेळली १९ वर्षे होऊन गेलेली शेफाली वर्मा; कसं झाले हे शक्य?

Jan 30, 2023, 04:48 PM IST

  • ICC Women's Under-19 Cricket World Cup : २८ जानेवारीला भारताच्या अंडर १९ महिला संघाची कर्णधार शेफाली वर्मा हीचे १९ वर्ष पूर्ण झाले होते. असे असतांना देखील तिला २९ जानेवारीला अंतिम सामन्यात खेळण्याची संधी दिली गेली. जाऊन घेऊयात या बद्दल.

who is Shafali Verma

ICC Women's Under-19 Cricket World Cup : २८ जानेवारीला भारताच्या अंडर १९ महिला संघाची कर्णधार शेफाली वर्मा हीचे १९ वर्ष पूर्ण झाले होते. असे असतांना देखील तिला २९ जानेवारीला अंतिम सामन्यात खेळण्याची संधी दिली गेली. जाऊन घेऊयात या बद्दल.

  • ICC Women's Under-19 Cricket World Cup : २८ जानेवारीला भारताच्या अंडर १९ महिला संघाची कर्णधार शेफाली वर्मा हीचे १९ वर्ष पूर्ण झाले होते. असे असतांना देखील तिला २९ जानेवारीला अंतिम सामन्यात खेळण्याची संधी दिली गेली. जाऊन घेऊयात या बद्दल.

ICC Women's Under-19 Cricket World Cup : अंडर १९ क्रिकेट सामन्यात १९ वर्षांखालील खेळाडूंनी खेळणे अपेक्षित आहे. मात्र, आयसीसी अंडर १९ महिला टी २० च्या अंतिम सामन्यात काही वेगळेच चित्र पाहायला मिळाले. या सामन्यात १९ वर्षापेक्षा अधिक वय असेलेल्या एका महिला खेळाडूने सहभाग घेतला. ही महिला खेळाडू दुसरी तिसरी कुणी नसून भारतीय महिला संघाची कर्णधार शेफाली शर्मा आहे. शेफाली ही अंडर १९ भारतीय संघाची कर्णधार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

शेफाली वर्मा हीने २८ जानेवारी २०२३ ला तिच्या  वयाचे १९ वर्ष पूर्ण केले. मात्र, असे असतांनाही तिने  २९ जानेवारीला  आयसीसी अंडर १० महिला टी २० वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळला. जेव्हा अंडर १९ विश्वचषकाचा सामना खेळला जातो तेव्हा खेळाडूचे वय हे १९ वर्षांपेक्षा कमी असणे अपेक्षित असते. मात्र, या ठिकाणी असे काही झाले नाही. शेफाली हीचे वय जास्त झाले असतांना देखील तिला अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. आयसीसीच्या नियमावली अंतर्गत तिला खेळण्याची संधी दिली गेली. ज्यामुळे तिच्या खेळण्यावर कुणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकणार नाही.

काय आहे नियम ?

अंडर १९ क्रिकेटच्या नियमानुसार कोणताही खेळाडू हा १९ वर्षांपेक्षा जास्त वयाचा असल्यास त्याला या संघात खेळण्याची परवानगी नाही. मात्र, आयसीसीने विश्वचषका संदर्भात काही वेगळी नियमावली तयार केली आहे. वर्ल्ड कप दरम्यान वयाला जास्त महत्व दिल्या जात नाही, या संदर्भात आयसीसीची काही नियमावली आहे. संजू सैमसनने देखील १९ वर्ष उलटूनही अंडर १९ विश्वचक्षकाचा अंतिम सामना खेळला होता. आयसीसीने अंडर १९ वर्ल्ड कपच्या पात्रतेसंदर्भात  १ सप्टेंबर ही तारीख वय मोजण्यासाठी ठरवली आहे. अंडरवर्ल्ड कप हा वर्षाच्या सुरवातीच्या सहा महिन्यात होतो. त्यामुळे गेल्या वर्षीच्या १ संपटेंबर पर्यन्त खेळाडू हा अंडर १९ असणे गरजेचे आहे. पण त्याच वर्षी शेवटच्या काही महिन्यात जर वर्ल्ड कपचे आयोजन झाल्यास त्याच वर्षी १ सप्टेंबर पर्यन्त खेळाडूचे वय हे १९ वर्षांखाली असणे गरजेचे आहे.

शेफाली वर्मा हिच्या केसमध्ये देखील ही बाब लागू होते. तीचे वय १९ वर्षांपेक्षा जास्त zhaleअसतांना देखील ती वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळू शकली. शेफाली हीचे वय १ सप्टेंबर २०२२ मध्ये १९ वर्षांपेक्षा कमी होते. यामुळे ते या सामन्यात खेळण्यास योग्य होती. या कारणामुळे तिच्या अंतिम सामन्यात खेळण्यावर कुणी आक्षेप घेऊ शकले नाही. जर वर्ल्ड कप सप्टेंबर महिन्यानंतर असता तर शेफाली या सामन्यात खेळण्यास पात्र ठरली नसती.

विभाग

पुढील बातम्या