मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shafali Verma Video : आम्ही वर्ल्ड कप जिंकायला आलो होतो...', कॅप्टन शेफाली वर्मा ढसाढसा रडली

Shafali Verma Video : आम्ही वर्ल्ड कप जिंकायला आलो होतो...', कॅप्टन शेफाली वर्मा ढसाढसा रडली

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 29, 2023 10:24 PM IST

Shafali Verma crying afetr won under 19 world cup: अंडर १९ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ६८ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी अवघ्या ६९ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताने ते ३ गड्यांच्या मोबदल्यात १४ षटकात पूर्ण केले.

Shafali Verma Video U-19 Women's T20 WC Final
Shafali Verma Video U-19 Women's T20 WC Final

Shafali Verma & team india won under 19 world cup : महिलांचा अंडर १९ वर्ल्डकप भारताने जिंकला आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळवण्यात आली होती. शेफाली वर्माच्या नेतृत्वात भारताने हा वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

चॅम्पियन बनल्यानंतर भारतीय संघाची कर्णधार शेफाली वर्मा खूप भावूक झाली. प्रेझेंटेशन सोहळ्यात शेफाली वर्मा काही वेळ रडत राहिली. हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेफाली वर्माने एक दिवस आधी तिचा वाढदिवस साजरा केला होता, त्यामुळे विश्वचषक विजयाने तिचा वाढदिवस अधिक खास झाला.

भारताच्या ज्युनियर किंवा सीनियर महिला संघाने यापूर्वी कधीही विश्वचषक जिंकला नव्हता. २००५ आणि २०१७ च्या महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताच्या वरिष्ठ संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचवेळी २०२० महिला टी-20 विश्वचषक फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. रिचा घोष आणि शेफाली वर्मा त्या T20 संघाचा भाग होत्या.

सामन्यानंतर शेफाली काय म्हणाली?

शेफाली वर्माने विश्वचषक विजयानंतर सांगितले की, 'सर्व मुली ज्या प्रकारे परफॉर्म करत आहेत आणि एकमेकांना सपोर्ट करत आहेत त्यामुळे मी खूप आनंदी आहे. सपोर्ट स्टाफचेही खूप आभार, ज्या प्रकारे ते आम्हाला दररोज पाठिंबा देत आहेत आणि आम्हाला सांगत आहेत की आम्ही चषक जिंकण्यासाठी येथे आहोत. तसेच, सर्व खेळाडू मला खूप साथ देत आहेत. मला हा सुंदर संघ दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार आणि चषक जिंकल्यानंतर आम्ही खूप आनंदी आहोत".

श्वेता सेहरावतचे कौतुक करताना शेफाली म्हणाली, 'ती (श्वेता सेहरावत) उत्कृष्ट आहे आणि तिने सर्व गेम प्लॅन फॉलो केले आहेत. केवळ तीच नाही, तर अर्चना, सौम्यासह सर्वांनी शानदार खेळ दाखवला. ते सर्व अविश्वसनीय आहेत. भारतीय वरिष्ठ संघ टी-२० विश्वचषक जिंकण्यात यशस्वी होईल, अशी शेफालीला आशा आहे. पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या