मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind vs Aus Semifinal : टीम इंडियाला मोठा झटका, हरमनप्रीत कौर सेमी फायनलमधून बाहेर?

Ind vs Aus Semifinal : टीम इंडियाला मोठा झटका, हरमनप्रीत कौर सेमी फायनलमधून बाहेर?

Feb 23, 2023, 02:28 PM IST

    • harmanmanpreet kaur & pooja vastrakar illness : महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघातून एक वाईट बातमी आली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अष्टपैलू पूजा वस्त्राकर या सामन्यातून बाहेर राहू शकतात. हरमनप्रीत कौर बाहेर पडल्यास स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार असेल.
Ind vs Aus Semifinal

harmanmanpreet kaur & pooja vastrakar illness : महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघातून एक वाईट बातमी आली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अष्टपैलू पूजा वस्त्राकर या सामन्यातून बाहेर राहू शकतात. हरमनप्रीत कौर बाहेर पडल्यास स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार असेल.

    • harmanmanpreet kaur & pooja vastrakar illness : महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघातून एक वाईट बातमी आली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अष्टपैलू पूजा वस्त्राकर या सामन्यातून बाहेर राहू शकतात. हरमनप्रीत कौर बाहेर पडल्यास स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार असेल.

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला-टी-20 वर्ल्डकपचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. आज (२३ फेब्रुवारी) या स्पर्धेतील पहिला सेमी फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये होणार आहे. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या संघाची नजर फायनलमध्ये प्रवेश करण्यावर असणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता होईल. 

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

हरमनप्रीत आणि पुजा खेळणार की नाही हे सामन्यापूर्वीच ठरेल

दरम्यान, या सामन्यापूर्वी भारतीय संघातून मोठी बातमी समोर येत आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अष्टपैलू पूजा वस्त्राकर या सामन्यातून बाहेर राहू शकतात. एका वृत्तानुसार, दोन्ही खेळाडू आजारी आहेत आणि त्यांना सामन्याच्या आदल्या दिवशी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र संध्याकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

विशेष म्हणजे, पुजा आणि हरमनप्रीत सामना खेळणार की नाही हे सामन्यापूर्वीच निश्चित केले जाईल. हरमनप्रीत कौर बाहेर पडल्यास स्मृती मानधना संघाचे नेतृत्व करू शकते.

पुजा आणि हरमनप्रीत या दोघी बाहेर पडल्यास भारतीय संघाचे बरेच नुकसान होईल कारण राधा यादवच्या फिटनेसबाबतही चिंता आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या दोन दिग्गज खेळाडूंची अनुपस्थिती एखाद्या मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही.

जर हरमनप्रीत कौर खेळू शकली नाही तर तिच्या जागी हरलीन देओलचा समावेश केला जाऊ शकतो. हरमनप्रीतसाठी हा वर्ल्डकप आतापर्यंत चांगला राहिलेला नाही. तिने ४ सामन्यांत केवळ ६६ धावा केल्या आहेत. पण हरमनप्रीत कौर ही मोठ्या सामन्यांची खेळाडू मानली जाते. त्यामुळे तिचे संघात नसणे ही खूप चिंतेची बाब आहे.