मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs AFG: भारताचा अफगाणिस्तानवर १०१ धावांनी विजय, कोहलीचे शतक; भुवनेश्वरचे ५ बळी

IND vs AFG: भारताचा अफगाणिस्तानवर १०१ धावांनी विजय, कोहलीचे शतक; भुवनेश्वरचे ५ बळी

Sep 08, 2022, 10:47 PM IST

    • India Vs Afghanistan Asia Cup 2022 Super 4: भारताने २० षटकांत २ बाद २१२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १११ धावाच करू शकला. दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना होता.
IND vs AFG

India Vs Afghanistan Asia Cup 2022 Super 4: भारताने २० षटकांत २ बाद २१२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १११ धावाच करू शकला. दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना होता.

    • India Vs Afghanistan Asia Cup 2022 Super 4: भारताने २० षटकांत २ बाद २१२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १११ धावाच करू शकला. दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना होता.

आशिया चषक स्पर्धेच्या आपल्या शेवटच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा १०१ धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत २ बाद २१२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १११ धावाच करू शकला. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झादरानने सर्वाधिक नाबाद ६४ धावा केल्या. तर मुजीब उर रहमानने १८ आणि रशीद खानने १५ धावांचे योगनदान दिले.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ५ बळी घेतले. अर्शदीप सिंग, रविचंद्रन अश्विन आणि दीपक हुडा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.

दरम्यान, दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना आहे. पाकिस्तानपाठोपाठ टीम इंडियाचा श्रीलंकेकडून पराभव झाला. त्याचवेळी अफगाणिस्तानला आधी श्रीलंकेने आणि नंतर पाकिस्तानने पराभूत केले होते.

सुपर-४ फेरीत टीम इंडियाने दोन गुणांसह तिसरे स्थान पटकावले. त्याचवेळी अफगाणिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही. ते चौथ्या स्थानावर राहिले.

भारताचा डाव-

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ बाद २१२ धावा केल्या आहेत. टीम इंडियासाठी विराट कोहलीने ६१ चेंडूत नाबाद १२२ धावांची खेळी केली. केएल राहुलने ४१ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. तर ऋषभ पंत १६ चेंडूत २० धावा करून नाबाद राहिला.