मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli 71st Century: ७१ वं शतक अनुष्का अन् वामिकाच्या नावावर, विराटनं सांगितलं मोठं कारण

Virat Kohli 71st Century: ७१ वं शतक अनुष्का अन् वामिकाच्या नावावर, विराटनं सांगितलं मोठं कारण

Sep 08, 2022, 10:05 PM IST

    • Virat Kohli 71st Century Dedicated to anushka and vamika: कोहलीने सामन्यात १२२ धावांची नाबाद खेळी खेळली. विराटने ६१ चेंडूंच्या खेळीत १२ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट २००.००चा होता. शतक झळकावल्यानंतर कोहलीने सर्वप्रथम बोटातील रिंगचे चुंबन घेतले. कोहलीने असे का केले, याचा खुलासान त्याने भारतायी डावाच्या नंतर केला आहे.
Virat Kohli

Virat Kohli 71st Century Dedicated to anushka and vamika: कोहलीने सामन्यात १२२ धावांची नाबाद खेळी खेळली. विराटने ६१ चेंडूंच्या खेळीत १२ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट २००.००चा होता. शतक झळकावल्यानंतर कोहलीने सर्वप्रथम बोटातील रिंगचे चुंबन घेतले. कोहलीने असे का केले, याचा खुलासान त्याने भारतायी डावाच्या नंतर केला आहे.

    • Virat Kohli 71st Century Dedicated to anushka and vamika: कोहलीने सामन्यात १२२ धावांची नाबाद खेळी खेळली. विराटने ६१ चेंडूंच्या खेळीत १२ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट २००.००चा होता. शतक झळकावल्यानंतर कोहलीने सर्वप्रथम बोटातील रिंगचे चुंबन घेतले. कोहलीने असे का केले, याचा खुलासान त्याने भारतायी डावाच्या नंतर केला आहे.

विराट कोहलीच्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा आता संपली आहे. कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१ वे शतक झळकावले आहे. कोहलीने ५३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतक ठोकण्याची कोहलीची शैलीही शानदार होती. त्याने फरीद मलिकच्या गोलंदाजीवर डीप-मिडविकेटवर षटकार ठोकून शतक पूर्ण केले. दुबईत सुरू असलेल्या आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीच्या सामन्यात कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध हे शतक पूर्ण केले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

त्याने या सामन्यात १२२ धावांची नाबाद खेळी खेळली. विराटने ६१ चेंडूंच्या खेळीत १२ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट २००.००चा होता. शतक झळकावल्यानंतर कोहलीने सर्वप्रथम बोटातील रिंगचे चुंबन घेतले. कोहलीने असे का केले, याचा खुलासान त्याने भारतायी डावाच्या नंतर केला आहे.

<p>virat kohli</p>

भारताचा डाव संपल्यानंतर कोहली म्हणाला, “मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. नोव्हेंबर २०१९ नंतर आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. या फॉरमॅटमध्ये मला शतकाची अपेक्षा नव्हती. जेव्हा मी संघात परतलो तेव्हा सर्वांनी माझे स्वागत केले. मी माझ्या रिंगचे चुंबन घेतले. कारण अनुष्का शर्मा कठीण काळात माझ्या पाठीशी उभी राहिली. हे शतक तिचे आणि मुलगी वामिकाचे आहे".

विराट पुढे म्हणाला, “खेळापासून दूर राहून मी खूप काही शिकलो. लोक माझ्या शतकाबद्दल बोलत होते. मी सहा महिने ब्रेक घेतला. मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकलो होतो. मला माझ्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची होती. मला माझी लय सापडली आहे".

<p>virat kohli</p>

कोहलीने यापूर्वी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर नोव्हेंबर २०१९ मध्ये डे-नाईट कसोटीत बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. त्यानंतर विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्यासाठी ८४ डावांची वाट पाहावी लागली.

विराटच्या पुढे आता फक्त सचिन तेंडुलकर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत विराट संयुक्त दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कोहलीच्या नावावर ७१ शतके आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची बरोबरी केली आहे. आता त्याच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर आहे. तेंडुलकरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०० शतके झळकावली होती.

पुढील बातम्या