मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs WI : हे मात्र अतिच झालं! सामन्याची वेळ पुन्हा बदलली, चाहते संतापले

IND vs WI : हे मात्र अतिच झालं! सामन्याची वेळ पुन्हा बदलली, चाहते संतापले

Aug 01, 2022, 10:00 PM IST

    • या आधी ही वेळ रात्री १० वाजता करण्यात आली होती. त्यानंतर वेळ आणखी एक तासाने वाढवण्यात आली आहे. आता नाणेफेक साडेदहा वाजता होणार आहे. तर पहिला चेंडू रात्री ११ वाजता टाकला जाईल.
ind vs wi

या आधी ही वेळ रात्री १० वाजता करण्यात आली होती. त्यानंतर वेळ आणखी एक तासाने वाढवण्यात आली आहे. आता नाणेफेक साडेदहा वाजता होणार आहे. तर पहिला चेंडू रात्री ११ वाजता टाकला जाईल.

    • या आधी ही वेळ रात्री १० वाजता करण्यात आली होती. त्यानंतर वेळ आणखी एक तासाने वाढवण्यात आली आहे. आता नाणेफेक साडेदहा वाजता होणार आहे. तर पहिला चेंडू रात्री ११ वाजता टाकला जाईल.

सामन्याच्या काही तास आधी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने पुन्हा सामन्याच्या वेळेत बदल केला आहे. आता हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ ऐवजी रात्री ११ वाजता खेळवण्यात येणार आहे. या आधी ही वेळ रात्री १० वाजता करण्यात आली होती. त्यानंतर वेळ आणखी एक तासाने वाढवण्यात आली आहे. आता नाणेफेक साडेदहा वाजता होणार आहे. तर पहिला चेंडू रात्री १ वाजता टाकला जाईल. वास्तविक, खेळाडूंचे सामान सेंट किट्सला उशिरा पोहोचले. त्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला हा निर्णय घ्यावा लागला.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

टीम इंडियाची नजर मालिकेत सलग दुसऱ्या विजयावर आहे. २९ जुलै रोजी त्रिनिदाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने यजमानांचा ६८ धावांनी पराभव केला होता. भारतीय संघ सेंट किट्सच्या बॅसेटेरे येथे प्रथमच टी-20 सामना खेळणार आहे.

भारतीय संघाने वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंत ५ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान भारतीय संघाला ३ विजय आणि २ पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे, २०१७ पासून भारत वेस्ट इंडिजमध्ये हरलेला नाही. भारताचा शेवटचा पराभव २०१७ मध्ये किंग्स्टन येथे झाला होता.

शेवटच्या दोन T20 सामन्यांबाबत सस्पेंस-

मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत होणार आहेत. मात्र, आता या सामन्यांमध्ये एक मोठी अडचण निर्माण झाली. भारतीय खेळाडूंच्या व्हिसाच्या अडचणींमुळे आता कॅरेबियन क्रिकेट बोर्ड उरलेले दोन्ही सामने वेस्ट इंडिजमध्येच खेळवण्याचा विचार करत आहे.

एका रिपोर्टनुसार, दोन्ही संघांना अद्यापही अमेरिकेचा व्हिसा मिळालेला नाही. त्यामुळे क्रिकेट वेस्ट इंडिजला पर्यायी योजना आखावी लागणार आहे. हे दोन्ही सामने ६ आणि ७ ऑगस्ट रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहेत, परंतु भारत आणि वेस्ट इंडिज संघातील अनेक सदस्यांना अमेरिकेचा व्हिसा अजूनही मिळालेला नाही.

एका सूत्राने सांगितले की, “व्हिसा समस्येचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. हे सामने वेस्ट इंडिजमध्येही होऊ शकतात. भारतीय संघाला सेंट किट्समध्येच व्हिसा दिला जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

विंडीजविरुद्ध T20I साठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, संजू सॅमसन, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, भुवनेश यादव, खान, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग.