मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND Vs NZ 2nd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारत विजयी, मालिका १-१ बरोबरीत

IND Vs NZ 2nd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारत विजयी, मालिका १-१ बरोबरीत

Jan 29, 2023, 06:32 PM IST

    • India vs New Zealand 2nd T20 highlights : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना भारताने ६ विकेट्सने जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. 
IND Vs NZ 2nd T20 Live Score

India vs New Zealand 2nd T20 highlights : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना भारताने ६ विकेट्सने जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

    • India vs New Zealand 2nd T20 highlights : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना भारताने ६ विकेट्सने जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. 

 India vs New Zealand 2nd T20 highlights : भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा सहा गडी राखून पराभव केला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत आठ गडी गमावून ९९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य एका चेंडू राखून पूर्ण केले.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

 भारताविरुद्ध टी-20 मध्‍ये किवी संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात टीम इंडियाने एक चेंडू बाकी असताना चार गडी गमावून लक्ष्य गाठले. सूर्यकुमार यादवने भारतीय डावातील २०व्या षटकातील पाचव्या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकवला. या विजयासह तीन सामन्यांच्या T20I मालिकेत आता १-१ अशी बरोबरी झाली आहे. निर्णायक सामना १ फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक नाबाद १९ धावा केल्या. त्याचवेळी मायकेल ब्रेसवेल आणि मार्क चॅपमन यांनी १४-१४ धावा केल्या. फिन भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. त्याचबरोबर भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक नाबाद २६ धावा केल्या. त्याचवेळी इशान किशनने १९ धावांची खेळी केली. कर्णधार हार्दिक पंड्या १५ धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून ब्रेसवेल आणि सोधीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

न्यूझीलंडसाठी सामन्यातील सर्वात मोठी भागीदारी अॅलन आणि कॉनवे यांच्यात २१ धावांची होती. त्याचबरोबर भारताकडून सर्वात मोठी भागीदारी सूर्यकुमार आणि हार्दिक यांच्यात झाली. दोघांनी ३० धावांची नाबाद भागीदारी केली. या सामन्यात दोन्ही संघांना एकही षटकार मारता आला नाही. दोन्ही डावात एकही षटकार न मारता एकूण २३९ चेंडू टाकले गेले. यापूर्वी २०२१ मध्ये बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात मीरपूरमध्ये २३८ चेंडूत एकही षटकार आला नव्हता.

IND vs NZ Live: भारताला २९ धावांची गरज 

१४ षटकांनंतर भारताने ४ गडी गमावून ७१ धावा केल्या आहेत. सध्या सूर्यकुमार यादव १६  चेंडूत १३ धावा करून फलंदाजी करत आहे. भारताला विजयासाठी अजून ३६ चेंडूत २९ धावांची गरज आहे.

IND Vs NZ 2nd T20 Live Score : न्यूझीलंडच्या १०० धव

न्यूझीलंडने भारतासमोर १०० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. किवी संघाने २० षटकांत आठ गडी गमावून ९९ धावा केल्या. ही न्यूझीलंडची भारताविरुद्धची टी-20 मधील सर्वात कमी धावसंख्या आहे. भारतीय फिरकीपटूंसमोर न्यूझीलंडचे फलंदाज हतबल दिसत होते. फिरकीपटूंनी एकूण ४ विकेट घेतल्या. सर्वप्रथम फिरकीपटू युजवेंद्र चहलने फिन ऍलनला क्लीन बोल्ड केले. अॅलनला ११ धावा करता आल्या.

यानंतर वॉशिंग्टन सुंदरने डेव्हॉन कॉनवेला इशान किशनकरवी झेलबाद केले. त्याला ११ धावाही करता आल्या. त्यानंतर दीपक हुडाने ग्लेन फिलिप्सला (५) बाद करत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. यानंतर कुलदीप यादवने डॅरिल मिशेलला क्लीन बोल्ड केले. मिशेल आठ धावा करू शकला.

मार्क चॅपमनला कुलदीपने धावबाद केले. त्याला २१ चेंडूत १४ धावा करता आल्या. त्याचवेळी मायकेल ब्रेसवेलला कर्णधार हार्दिक पांड्याने अर्शदीप सिंगच्या हाती झेलबाद केले. त्याला १४ धावा करता आल्या. यानंतर १८व्या षटकात अर्शदीपने एका षटकात दोन बळी घेतले. त्याने ईश सोधीला हार्दिककडे झेलबाद केले. त्यानंतर फर्ग्युसनला सुंदरकरवी झेलबाद केले. सोधीला एका धावेवर आणि फर्ग्युसन शुन्यावर बाद झाला.

कर्णधार मिचेल सँटनर १९ धावांवर नाबाद राहिला आणि जेकब डफीने सहा धावा केल्या. भारताकडून अर्शदीपने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर चहल, कुलदीप, हुडा, सुंदर आणि हार्दिक यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

8:40: IND Vs NZ 2nd T20 Live Score : न्यूझीलंडला आठवा धक्का

१७व्या षटकात हार्दिक पांड्याने मायकल ब्रेसवेलला अर्शदीपकडे झेलबाद केले. त्याला १४ धावा करता आल्या. यानंतर १८व्या षटकात अर्शदीपने एका षटकात दोन बळी घेतले. त्याने ईश सोधीला हार्दिककडे झेलबाद केले. त्यानंतर फर्ग्युसनला सुंदरकरवी झेलबाद केले. सोधीला एका धावेवर आणि फर्ग्युसन शुन्यावर बाद झाला. 

8:05: IND Vs NZ 2nd T20 Live Score: न्यूझीलंडला पाचवा धक्का

१३व्या षटकात ६० धावांवर न्यूझीलंडला पाचवा धक्का बसला. दीपक हुडाच्या षटकात कुलदीप यादवने शानदार थ्रोवर मार्क चॅपमनला धावचीत केले. चॅपमनला २१ चेंडूत १४ धावा करता आल्या. न्यूझीलंडची धावसंख्या १३ षटकांत ५ बाद ६२ अशी आहे. सध्या मायकेल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर क्रीजवर आहेत.

7:20: IND Vs NZ 2nd T20 Live Score : युझीची शानदार गोलंदाजी, एलन तंबूत

चौथ्या षटकात न्यूझीलंडचा पहिला विकेट पडला आहे. षटकातील तिसऱ्या चेंडूवर युझवेंद्र चहलने फिन एलनला त्रिफळाचीत केले. एलनने १० चेंडूत ११ धावा केल्या. ४ षटकात न्यूझीलंडच्या १ बाद २१ धावा झाल्या आहेत.

6:37: IND Vs NZ 2nd T20 Live Score : दोन्ही संघ 

भारत : इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (wk), मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, जेकब डफी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.

6:35: IND Vs NZ 2nd T20 Live Score : न्यूझीलंडने टॉस जिंकला, भारतीय संघात एक बदल

न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाताही बदल केलेला नाही. तर भारतीय संघात युझवेंद्र चहलचे पुनरागमन झाले आहे. वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या जागी युझवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे.

6:30: IND Vs NZ 2nd T20 Live Score : भारत-न्यूझीलंड आकडेवारी

भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण २३ टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १०, तर किवी संघाने १० सामने जिंकले आहेत. तीन सामने बरोबरीत राहिले आहेत. दोन्ही संघ भारतात नऊ वेळा आमनेसामने आले आहेत. यातील टीम इंडियाने पाचवेळा, तर न्यूझीलंडने चार सामने जिंकले. लखनौच्या एकना स्टेडियमवर दोन्ही संघ प्रथमच भिडणार आहेत.