मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs ENG Playing 11: आज पहिला वन-डे, कोहलीच्या खेळण्यावर सस्पेन्स

IND vs ENG Playing 11: आज पहिला वन-डे, कोहलीच्या खेळण्यावर सस्पेन्स

Jul 12, 2022, 01:57 PM IST

    • इंग्लंडने भारताविरुद्ध आतापर्यंत ८ मालिका जिंकल्या आहेत. अशा स्थितीत रोहित शर्माची नजर मालिका जिंकण्यावर असेल. 
virat kohli

इंग्लंडने भारताविरुद्ध आतापर्यंत ८ मालिका जिंकल्या आहेत. अशा स्थितीत रोहित शर्माची नजर मालिका जिंकण्यावर असेल.

    • इंग्लंडने भारताविरुद्ध आतापर्यंत ८ मालिका जिंकल्या आहेत. अशा स्थितीत रोहित शर्माची नजर मालिका जिंकण्यावर असेल. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेनंतर आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर संध्याकाळी ५:३० वाजता सुरू होईल. 

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

कसोटी सामना गमावल्यानंतर भारताने T20I मालिकेत जबरदस्त पुनरागमन केले आणि मालिका २-१ ने जिंकली. आता टीम इंडियासमोर तीन सामन्यांची वनडे मालिका जिंकण्याचे आव्हान असेल. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, शिखर धवन यांसारख्या फलंदाजांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे.

भारताने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत १० एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत, परंतु इंग्लिश भूमीवर टीम इंडियाला केवळ तीनच मालिका जिंकता आल्या आहेत. भारताने इंग्लंडमध्ये आपला शेवटचा मालिका विजय ८ वर्षांपूर्वी मिळवला होता.  टीम इंडियाने २०१४ मध्ये इंग्लंडला ३-१ असे पराभूत केले होते. तर, इंग्लंडने भारताविरुद्ध आतापर्यंत ८ मालिका जिंकल्या आहेत.

वन-डेत इंग्लंडवर टीम इंडिया भारी-

एकूण सामने: १०३

भारत : ५५

इंग्लंड : ४३

अनिर्णित: ०३

टाय: ०२

इंग्लंडमध्ये भारताची कामगिरी-

एकदिवसीय सामने: ४२

भारत : १६ 

इंग्लंड : २२

अनिर्णित: ०३

टाय: ०१

विराट कोहलीवर सर्वांच्या नजरा-

या मालिकेतून विराट कोहली फॉर्ममध्ये परतेल अशी आशा आहे. या दौऱ्यावरील कसोटी आणि टी-२० मध्ये त्याच्या बॅटमधून धावा निघालेल्या नाहीत.  तसेच, मांडीच्या दुखापतीमुळे तो आजचा सामना खेळेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. 

विशेष म्हणजे, विराटचा इंग्लंडविरुद्ध रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. त्याने ३३ सामन्यात ४५.०६ च्या सरासरीने १३०७ धावा केल्या आहेत, ज्यात ३ शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. तर १२२ ही त्याची इंग्लंडविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या आहे.

कर्णधार म्हणून जॉस बटलरची पहिलीच वन-डे मालिका-

इयॉन मॉर्गनच्या निवृत्तीनंतर इंग्लंडचा नियमित कर्णधार म्हणून जॉस बटलरची ही पहिली वनडे मालिका असणार आहे. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडला टी-२० मालिकेत अपयश आले. मात्र, आता बेन स्टोक्स, जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांसारख्या दिग्गजांच्या पुनरागमनाने संघाला खूप बळकटी मिळाली आहे. 

रूट आणि बेअरस्टो यांचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. 

संभाव्य संघ-

भारत

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली/श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर/  प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल.

इंग्लंड

जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, जोस बटलर (कर्णधार), बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, डेव्हिड विली, मॅथ्यू पार्किन्सन, रीस टोपले.