मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs AUS T20: काही वेळात होणार टॉस, आठ षटकांचा सामना खेळवणार

IND vs AUS T20: काही वेळात होणार टॉस, आठ षटकांचा सामना खेळवणार

Sep 23, 2022, 09:04 PM IST

    • India Vs Australia T20i: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज (२३ सप्टेबर) नागपुरात होणार आहे.  मालिकेतील आव्हान टिकण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल.
IND vs AUS

India Vs Australia T20i: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज (२३ सप्टेबर) नागपुरात होणार आहे. मालिकेतील आव्हान टिकण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल.

    • India Vs Australia T20i: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज (२३ सप्टेबर) नागपुरात होणार आहे.  मालिकेतील आव्हान टिकण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना रात्री ९:१५ वाजता सुरु होणार आहे. रात्री ८.४५ वाजता पंचांनी मैदानाची पाहणी केली. यानंतर पंचांनी नाणेफेक रात्री ९:१५ वाजता होणार असल्याचे सांगितले. त्याच वेळी, सामना रात्री ९.३० वाजता सुरू होईल. हा सामना आठ षटकांचा असेल. त्याच वेळी, पॉवरप्ले दोन षटकांचा असेल. प्रत्येक गोलंदाज जास्तीत जास्त दोन षटके टाकू शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

 नागपुरात गेल्या तीन दिवसांपासून अधून-मधून पाऊस पडत आहे. त्यामुळे मैदान ओले आहे.  सुपरसॉपर्स खेळपट्टी कोरडी करण्यात गुंतले आहेत.

नाणेफेकीची वेळ सायंकाळी ६:३० वाजेची होती. मात्र, ओल्या मैदानामुळे ती पुढे ढकलून ७ वाजेची करण्यात आली. ७ वाजताही नाणेफेक झाली नाही. कारण मैदान खेळण्यायोग्य नव्हते. त्यामुळे अंपायर यांनी रात्री ८ आणि आता पुन्हा ९ वाजता मैदानाची पाहणी केली. त्यानंतर आता ९:३० वाजत सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

जसप्रीत बुमराह खेळण्याची शक्यता

या सामन्यातून जसप्रीत बुमराहचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. त्यामुळे उमेश यादवला संघाबाहेर बसावे लागणार आहे. प्लेईंग इलेव्हनमध्ये हाच एकमेव बदल असणार आहे.

जसप्रीत बुमराहला इंग्लंड दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. तेव्हापासून बुमराह टीम इंडियाच्या बाहेर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात तो संघात नव्हता. यानंतर बुमराहच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले जात होते.

मात्र, जसप्रीत बुमराह दुसऱ्या टी-20 सामन्यात प्लेइंग ११ चा भाग असणार आहे, असे संघ व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे पहिल्या टी-20 सामन्यात २ षटकात २७ धावा देणाऱ्या उमेश यादवला संघाबाहेर बसावे लागणार आहे.

बुमराहच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाची वेगवान गोलंदाजी मजबूत होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात २०८ धावांची मोठी धावसंख्या उभारूनही भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारताच्या पराभवाचे कारण वेगवान गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी होती.

दोन्ही देशांची संभाव्य प्लेइंग-११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल.

ऑस्ट्रेलिया : अॅरॉन फिंच (क), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.