मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind vs Aus 2nd ODI playing 11 : आज रोहित शर्मा खेळणार, सुर्या की इशान संघाबाहेर कोण जाणार?

Ind vs Aus 2nd ODI playing 11 : आज रोहित शर्मा खेळणार, सुर्या की इशान संघाबाहेर कोण जाणार?

Mar 19, 2023, 10:32 AM IST

    • Ind vs Aus 2nd ODI playing 11 : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (ind vs aus 2nd odi) दुसरा वनडे सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. रोहितच्या पुनरागमनामुळे भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल होणार आहे. प्लेइंग-११ मधून कोणता खेळाडू वगळला जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल.
Ind vs Aus 2nd ODI playing 11

Ind vs Aus 2nd ODI playing 11 : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (ind vs aus 2nd odi) दुसरा वनडे सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. रोहितच्या पुनरागमनामुळे भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल होणार आहे. प्लेइंग-११ मधून कोणता खेळाडू वगळला जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल.

    • Ind vs Aus 2nd ODI playing 11 : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (ind vs aus 2nd odi) दुसरा वनडे सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. रोहितच्या पुनरागमनामुळे भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल होणार आहे. प्लेइंग-११ मधून कोणता खेळाडू वगळला जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल.

Ind vs Aus 2nd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज रविवारी (१८ मार्च) विशाखापट्टणम येथे ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या दुसऱ्या वनडेद्वारे संघात पुनरागमन करणार आहे. कौटुंबिक कारणांमुळे तो पहिल्या वनडेत खेळू शकला नाही. त्याच्या जागी हार्दिक पांड्याने कर्णधारपद भूषवले.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग-११ वर असतील. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या वनडेसाठी संघात सामील होणार असल्याने भारतीय संघात बदल होणे निश्चित आहे. रोहितच्या पुनरागमनामुळे प्लेइंग-११ मधून कोणता खेळाडू बाहेर होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सूर्यकुमार यादव किंवा ईशान किशन या दोघांपैकी एकाला दुसऱ्या वनडेतून डच्चू मिळू शकतो. अशात सूर्या बाहेर बसण्याची शक्यता जास्त आहे कारण तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सतत फ्लॉप होत आहे. तसेच, इशान किशन मधल्या फळीत फलंदाजी करण्यात माहिर आहे आणि त्याने काही महिन्यांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकही झळकावले होते.

सूर्यकुमार यादवने टी-20 क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळ दाखवला आहे, पण ५० षटकांचा फॉरमॅट त्याच्यासाठी काही खास ठरत नाहीये. सूर्याने आतापर्यंत २१ एकदिवसीय सामन्यांच्या केवळ ४३३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन अर्धशतके झळकली. शेवटच्या १० डावांमध्ये सूर्याला केवळ ४ वेळा दुहेरी आकडा गाठता आला, यावरूनच त्याची खराब कामगिरी स्पष्ट होते.

दुसऱ्या वनडेसाठी संभाव्य संघ

भारत

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

ऑस्ट्रेलिया

डेव्हिड वॉर्नर / ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा