मराठी बातम्या  /  क्रीडा  /  All England Open: ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेतील उपांत्य फेरीत गायत्री गोपीचंद- त्रिशा जॉली यांचा पराभव

All England Open: ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेतील उपांत्य फेरीत गायत्री गोपीचंद- त्रिशा जॉली यांचा पराभव

Mar 19, 2023, 07:35 AM IST

  • Gayatri Gopichand- Treesa Jolly: ऑल इंग्लंड उपांत्य फेरीतील पराभवासह भारतीय जोडीचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

All England Open 2023

Gayatri Gopichand- Treesa Jolly: ऑल इंग्लंड उपांत्य फेरीतील पराभवासह भारतीय जोडीचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

  • Gayatri Gopichand- Treesa Jolly: ऑल इंग्लंड उपांत्य फेरीतील पराभवासह भारतीय जोडीचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

All England Open 2023: ऑल इंग्लंड ओपन २०२३ स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय जोडी गायत्री गोपीचंद (Gayatri Gopichand) आणि त्रिशा जॉली (Treesa Jolly) यांना कोरियन जोडी बाक ना हा (Baek Na Ha) आणि ली सो ही (Lee So Hee) यांच्याकडून २१-१०, २१-१० ने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारतीय जोडीचे ऑल इंडिया ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

या सामन्याच्या सुरुवातीला आघाडी घेतल्यानंतर भारतीय बॅडमिंटन जोडी मध्यभागी गडबडली आणि कोरियन जोडीला रोखण्यात अपयशी ठरली. भारतीय जोडीने पुनरागमनासाठी खूप प्रयत्न केले असले तरी कोरियन जोडीने त्यांना संधी दिली नाही. पहिल्या सेटमध्ये कोरियन जोडीने १४-१० वरून २१-१० अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारतीय जोडीला सावरण्याची एकही संधी मिळाली नाही. हा खेळ फक्त २० मिनिटे चालला.

यानंतर भारतीय जोडीने दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करण्याचा निश्चितच प्रयत्न केला. पण त्यांना विशेष काही करता आले नाही. कोरियन जोडीने २६ मिनिटे चाललेल्या या गेमवरही कब्जा केला आणि २१-१० अशा फरकाने जिंकला. जागतिक क्रमवारीत १७व्या क्रमांकावर असलेली भारतीय जोडीला ऑल इंग्लंड ओपनच्या मागच्या हंगामातही उपांत्य फेरीत निराशा हाती लागली होती, तिथे चीनच्या झू जियान झांग आणि यू झेंग यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद पुलेला या भारतीय जोडीने शुक्रवारी ली वेन मेई आणि लिऊ झुआन जुआन यांच्यावर २१-१४, १८-२१, २१-१२ असा विजय मिळवत सलग दुसऱ्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीच्या लढतीत भारतीय जोडीने माजी जागतिक क्रमवारीतील युकी फुकुशिमा आणि सायाका हिरोटा या जोडीचा २१-१४, २४-२२ मोठ्या फरकाने पराभव केला. तर, पहिल्या फेरीत त्यांनी थायलंडच्या जोंगकोल्फान कितिहारकुल आणि रविंदा प्रजोंगाई पराभवाची धुळ चारली होती.

विभाग