मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB vs GG WPL Highlights : सोफी डिव्हाईनची वादळी खेळी, आरसीबीने १५ षटकांत १८९ धावांचं लक्ष्य गाठलं
WPL 2023 RCB vs GG highlights
WPL 2023 RCB vs GG highlights

RCB vs GG WPL Highlights : सोफी डिव्हाईनची वादळी खेळी, आरसीबीने १५ षटकांत १८९ धावांचं लक्ष्य गाठलं

18 March 2023, 22:50 ISTRohit Bibhishan Jetnavare

WPL 2023 RCB vs GG highlights : आरसीबीने सलग दुसरा सामना जिंकला आहे. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २० षटकांत चार बाद १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १५.३ षटकांत २ बाद १८९ धावा करून सामना जिंकला. त्यांच्यासाठी सोफी डिव्हाईनने ३६ चेंडूत ९९ धावांची स्फोटक खेळी खेळली.

WPL RCB  vs GG, Women's Premier League 2023 : आरसीबीने गुजरात जायंट्सविरुद्ध मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी २७ चेंडू बाकी असताना आणि ८ विकेट्स राखून सामना जिंकला. सोफी डिव्हाईनच्या झंझावाती खेळीमुळे आरसीबीने सलग दुसरा सामना जिंकला. या विजयासह त्यांचे स्पर्धेतील आव्हान कायम आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

आरसीबीचे आता ७ सामन्यांतून २ विजयांसह ४ गुण झाले आहेत. त्याचबरोबर गुजरात जायंट्सचेही सात सामन्यांतून दोन विजयांसह चार गुण आहेत. चांगल्या नेट रनरेटमुळे आरसीबी चौथ्या स्थानावर आहे. तर गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे.

आरसीबीला त्यांचा शेवटचा साखळी सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचा आहे. तर गुजरात जायंट्सला त्यांचा शेवटचा सामना विरुद्ध यूपी वॉरियर्स विरुद्ध खेळायचा आहे.

गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २० षटकांत चार बाद १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १५.३ षटकांत २ बाद १८९ धावा करून सामना जिंकला. त्यांच्यासाठी सोफी डिव्हाईनने ३६ चेंडूत ९९ धावांची स्फोटक खेळी खेळली. डिव्हाईनने नऊ चौकार आणि आठ षटकार मारले. तिचा स्ट्राइक रेट २७५ होता. 

स्मृती मानधनाने ३१ चेंडूत ३७ धावा केल्या. दोघींनी पहिल्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली. हीदर नाइटने १५ चेंडूत २२ आणि एलिस पेरीने १२ चेंडूत १९ धावा करून सामना संपवला. दोन्ही फलंदाज नाबाद राहिले.

गुजरातचा डाव

टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरातकडून लॉरा वोल्वार्डने सर्वाधिक ६८ धावा केल्या. तिने ४२ चेंडूंच्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. ऍशले गार्डनरने २६ चेंडूत ४१ आणि सबिनेनी मेघनाने ३२ चेंडूत ३१ धावा केल्या. सोफिया डंकले १० चेंडूत १६ धावा करून बाद झाली. शेवटच्या षटकात हरलीन देओल आणि दयालन हेमलता यांनी तुफानी फलंदाजी केली.

दोघींनी मिळून ९ चेंडूत २७ धावांची भागीदारी केली. हेमलताने सहा चेंडूंत १६ धावा केल्या आणि हरलीन देओलने पाच चेंडूंत १२ धावा केल्या. आरसीबीकडून श्रेयंका पाटीलने दोन बळी घेतले. सोफी डिव्हाईन आणि प्रीती बोस यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.