मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Team India: वर्ल्डकपआधी BCCI अ‍ॅक्शन मोडवर, भारतीय संघात झाले ‘हे’ मोठे बदल

Team India: वर्ल्डकपआधी BCCI अ‍ॅक्शन मोडवर, भारतीय संघात झाले ‘हे’ मोठे बदल

Dec 06, 2022, 07:19 PM IST

    • Hrishikesh Kanitkar new coach Indian Women Team: बीसीसीआय आता पूर्ण अॅक्शन मोडमध्ये आली आहे. ते धडाधड निर्णय घेत आहेत. आजही BCCI ने एक मोठा निर्णय घेतला आहे. BCCI ने हृषिकेश कानिटकर याची भारतीय महिला संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. कानिटकर अंडर १९ पुरुष क्रिकेट संघाचा कोच होता. त्याच्या कार्यकाळात भारतीय संघाने अंडर -१९ वर्ल्डकप जिंकला होता. यश धूल त्या संघाचा कर्णधार होता.
Hrishikesh Kanitkar new coach Indian Women Team

Hrishikesh Kanitkar new coach Indian Women Team: बीसीसीआय आता पूर्ण अॅक्शन मोडमध्ये आली आहे. ते धडाधड निर्णय घेत आहेत. आजही BCCI ने एक मोठा निर्णय घेतला आहे. BCCI ने हृषिकेश कानिटकर याची भारतीय महिला संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. कानिटकर अंडर १९ पुरुष क्रिकेट संघाचा कोच होता. त्याच्या कार्यकाळात भारतीय संघाने अंडर -१९ वर्ल्डकप जिंकला होता. यश धूल त्या संघाचा कर्णधार होता.

    • Hrishikesh Kanitkar new coach Indian Women Team: बीसीसीआय आता पूर्ण अॅक्शन मोडमध्ये आली आहे. ते धडाधड निर्णय घेत आहेत. आजही BCCI ने एक मोठा निर्णय घेतला आहे. BCCI ने हृषिकेश कानिटकर याची भारतीय महिला संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. कानिटकर अंडर १९ पुरुष क्रिकेट संघाचा कोच होता. त्याच्या कार्यकाळात भारतीय संघाने अंडर -१९ वर्ल्डकप जिंकला होता. यश धूल त्या संघाचा कर्णधार होता.

बीसीसीआयने हृषिकेश कानिटकर याची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी तो संघात सामील होईल. ही मालिका ९ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होत आहे. यासोबतच भारतीय महिला संघाचा माजी प्रशिक्षक रमेश पोवार याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) पाठवण्यात आले आहे. पोवार येथे व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नेतृत्वाखाली काम करेल. महिला संघासोबत दीर्घकाळ काम केलेला पोवार आता पुरुष खेळाडूंसोबत काम करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून कानिटकरची नियुक्ती

तसं पाहिलं तर, आगामी महिला टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयने हृषिकेश कानिटकरला भारतीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनवले आहे. महिला T20 विश्वचषक २०२३ हा दक्षिण आफ्रिकेत १० ते २६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जाणार आहे. हृषीकेश कानिटकर याला प्रशिक्षणासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे.

कोचपदी नियुक्ती झाल्यानंतर हृषिकेश कानिटकर काय म्हणाला?

नवीन जबाबदारी सोपवण्यात आल्यावर हृषिकेश कानिटकर म्हणाला, “वरिष्ठ महिला संघाचा नवा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होणे हा सन्मान आहे. मला या संघात प्रचंड क्षमता दिसते आणि आमच्याकडे युवा खेळाडू आणि अनुभव यांचा चांगला मिलाफ आहे. मला विश्वास आहे की हा संघ पुढील आव्हानासाठी सज्ज आहे. आमच्याकडे काही मोठ्या स्पर्धा येत आहेत. त्या संघासाठी आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी रोमांचक असतील."

NCA मध्ये नवी जबाबदारी मिळाल्यानंतर रमेश पोवार काय म्हणाला?

तसेच, MCA मध्ये नियुक्ती झाल्यानंतर रमेश पोवार म्हणाला की, “वरिष्ठ महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून माझा कार्यकाळ खूप चांगला राहिला. गेल्या काही वर्षांत, मी खेळातील काही दिग्गज आणि देशातील नवोदित प्रतिभांसोबत जवळून काम केले आहे. NCA मध्ये मी भविष्यासाठी नवीन टॅलेंट तयार करण्यात मदत करणार आहे. खेळ आणि बेंच स्ट्रेंथ विकसित करण्यासाठी मी व्हीव्हीएस लक्ष्मणसोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे.”