मराठी बातम्या  /  क्रीडा  /  HBD Sandeep Patil: संदीप पाटील हे सचिनला भारतीय संघातून वगळणार होते, पण...

HBD Sandeep Patil: संदीप पाटील हे सचिनला भारतीय संघातून वगळणार होते, पण...

HT Marathi Desk HT Marathi

Aug 18, 2022, 04:13 PM IST

    • Sandeep Patil birthday: टीम इंडियाचे माजी खेळाडू संदीप पाटील यांचा आज ६६ वा वाढदिवस आहे. १९५६ मध्ये मुंबईत जन्मलेल्या पाटील यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि भारतीय निवड समितीचे अध्यक्ष म्हणून खूप प्रसिद्धी मिळवली. १९८३ चा विश्वचषक जिंकण्यात संदीप पाटील यांचाही महत्त्वाचा वाटा होता.
Sandeep Patil

Sandeep Patil birthday: टीम इंडियाचे माजी खेळाडू संदीप पाटील यांचा आज ६६ वा वाढदिवस आहे. १९५६ मध्ये मुंबईत जन्मलेल्या पाटील यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि भारतीय निवड समितीचे अध्यक्ष म्हणून खूप प्रसिद्धी मिळवली. १९८३ चा विश्वचषक जिंकण्यात संदीप पाटील यांचाही महत्त्वाचा वाटा होता.

    • Sandeep Patil birthday: टीम इंडियाचे माजी खेळाडू संदीप पाटील यांचा आज ६६ वा वाढदिवस आहे. १९५६ मध्ये मुंबईत जन्मलेल्या पाटील यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि भारतीय निवड समितीचे अध्यक्ष म्हणून खूप प्रसिद्धी मिळवली. १९८३ चा विश्वचषक जिंकण्यात संदीप पाटील यांचाही महत्त्वाचा वाटा होता.

टीम इंडियाचे माजी स्फोटक फलंदाज संदीप पाटील यांचा आज वाढदिवस आहे. १८ ऑगस्ट १९५६ रोजी मुंबईत जन्मलेले संदीप पाटील आज ६६ वर्षांचे झाले आहेत. पाटील हे त्यांच्या स्टायलीश जीवनशैलीसाठी देखील खूपच लोकप्रिय होते. ते जेव्हा क्रिकेटमध्ये सक्रिय होते त्यावेळी त्यांची फिमेल फॅन फॉलोविंग ही नेहमी चर्चेचा विषय ठरायची.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

संदीप पाटील यांच्याविषयी काही खास गोष्टी

संदीप पाटील यांनी भारताला १९८३ चा विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पाटील यांनी इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकातील ८ डावात ३०.८५ च्या सरासरीने २१६ धावा केल्या होत्या. यात २ अर्धशतकांचा समावेश होता.

संदीप पाटील आपल्या कारकिर्दीत लांब लचक षटकार मारण्यासाठी ओळखले जात होते. १९७८-७९ दरम्यान देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाटील यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये एकूण १०२ षटकार ठोकले होते. विशेष म्हणजे पारसी जिमखाना येथे झालेल्या एका सामन्यात पाटील यांनी २१ षटकार ठोकले होते. त्यांनी मारलेला एक षटकार तर अरबी समुद्रात जावून पडला होता.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये संदीप पाटील यांनी सौराष्ट्राविरुद्ध लंच आणि टी ब्रेक दरम्यानच्या काळात शतक झळकावले होते. त्यांनी २१० धावांचा पाऊस पाडला होता. त्यावेळी त्यांनी मारलेला एक चेंडू तर वानखेडे स्टेडियमच्या बाहेर जावून पडला होता.

संदीप पाटील यांनी पहिले कसोटी शतक १९८१ मध्ये झळकावले. त्यांनी आपल्या करिअरमधल्या पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७४ धावांची खेळी केली. पाटील यांनी त्या मालिकेत ६२.२० च्या सरासरीने ३११ धावा ठोकल्या होत्या.

संदीप पाटील यांचे क्रिकेट विश्वाबाहेरील जग

संदीप पाटील यांनी प्रशिक्षक म्हणूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही खळबळ माजवली. पाटील यांनी २००३ च्या विश्वचषकात केनियाला उपांत्य फेरीपर्यंत नेले होते. उपांत्य फेरीत भारताकडून पराभूत झाल्याने केनियाचा संघ बाहेर पडला. 

संदीप पाटील यांनी केवळ क्रिकेटमध्येच नाही तर मॉडेलिंग आणि बॉलिवूड चित्रपटांमध्येही नशीब आजमावले आहे. 'कभी अजनबी' या चित्रपटात ते मुख्य कलाकार होते. या चित्रपटात त्यांनी पूनम ढिल्लनसोबत काम केले होते. 

२०१२ साली पाटील भारतीय निवड समितीचे अध्यक्ष बनले

सप्टेंबर २०१२ मध्ये संदीप पाटील टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता बनले आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. संदीप पाटील यांनी युवा खेळाडूंना संधी देण्याची व्यूहरचना आखली. पाटील यांनी सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनीबाबत मोठे निर्णय घेण्याचे ठरवले होते.

निवड समितीचे अध्यक्ष असताना पाटील हे सचिन तेंडुलकरला संघातून वगळण्याच्या विचारात होते.पण त्यांनी निर्णय घ्यायच्या आधीच सचिन निवृत्त झाला. तसेच, २०१५ वर्ल्ड कपच्या आधी महेंद्रसिंह धोनीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवायचे होते. असा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला होता.

संदीप पाटील यांचे करिअर-

संदीप पाटील यांनी भारतासाठी २९ कसोटी सामने खेळले. त्यात ३६.०९ च्या सरासरीने १५८८ धावा केल्या, या ४ शतकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे कसोटीतही त्यांचा स्ट्राइक रेट ७५ पेक्षा जास्त होता. वनडेमध्ये संदीप पाटील यांनी ४२ डावांत १००५ धावा केल्या होत्या. पाटील यांनी वनडेत ९ अर्धशतके झळकावली.