मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MI Vs GT Qualifier 2 : रोहित-सुर्या सगळे फेल, मुंबईचा धुव्वा उडवत गुजरात टायटन्स फायनलमध्ये

MI Vs GT Qualifier 2 : रोहित-सुर्या सगळे फेल, मुंबईचा धुव्वा उडवत गुजरात टायटन्स फायनलमध्ये

May 27, 2023, 12:07 AM IST

    • GT vs MI Qualifier 2 : गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव करत IPL 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गुजरातच्या विजयाचा हिरो ठरला तो शुभमन गिल, त्याने १२९ धावांची संस्मरणीय खेळी खेळली. त्याचवेळी मोहित शर्माने मुंबईच्या ५ खेळाडूंना बाद केले.
MI Vs GT Qualifier 2

GT vs MI Qualifier 2 : गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव करत IPL 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गुजरातच्या विजयाचा हिरो ठरला तो शुभमन गिल, त्याने १२९ धावांची संस्मरणीय खेळी खेळली. त्याचवेळी मोहित शर्माने मुंबईच्या ५ खेळाडूंना बाद केले.

    • GT vs MI Qualifier 2 : गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव करत IPL 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गुजरातच्या विजयाचा हिरो ठरला तो शुभमन गिल, त्याने १२९ धावांची संस्मरणीय खेळी खेळली. त्याचवेळी मोहित शर्माने मुंबईच्या ५ खेळाडूंना बाद केले.

GT vs MI Qualifier 2 highlights : गुजरात टायटन्सने IPL 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २६ मे (शुक्रवार) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या क्वालिफायर-2 सामन्यात गुजरातने पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव केला. मुंबईला विजयासाठी २३४ धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांचा संपूर्ण संघ १८.२ षटकांत १७१ धावांवर गारद झाला. आता २८ मे रोजी अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने ३८ चेंडूंत ६१ धावा केल्या, ज्यात ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. मात्र, सूर्याचा डाव गिलसमोर फिका पडला. सूर्याशिवाय तिलक वर्माने अवघ्या १४ चेंडूंत पाच चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४३ धावांचे योगदान दिले, तर कॅमेरून ग्रीनने ३० धावांची खेळी केली. याशिवाय बाकीचे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. 

गुजरातकडून वेगवान गोलंदाज मोहित शर्माने २.२ षटकांत १० धावा देत ५ बळी घेतले. त्याचवेळी मोहम्मद शमी आणि राशिद खान यांना प्रत्येकी दोन विकेट मिळाले.

गुजरातचा डाव

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात चांगली झाली. यष्टिरक्षक वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी मिळून ६.२ षटकात ५४ धावांची तुफानी भागीदारी केली. फिरकीपटू पियुष चावलाने साहाला यष्टीचीत करून ही भागीदारी तोडली. साहाने तीन चौकारांच्या मदतीने १८ धावा केल्या. पहिली विकेट पडल्यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शनने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. यादरम्यान गिलने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत अवघ्या ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

अर्धशतक पूर्ण केल्यानंतर गिलने षटकारांचा पाऊस पाडला. आकाश मढवालच्या एका षटकात गिलने ३ षटकार ठोकले. त्यानंतर १३व्या षटकात त्याने पियुष चावलालाही दोन षटकार आणि एक चौकार लगावला. गिलची झंझावाती फलंदाजी सुरूच राहिली आणि त्याने कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर सिंगल घेत शतक पूर्ण केले. गिलने ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले, ज्यात ८ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. गिलने सामन्यात ६० चेंडूत १२९ धावा केल्या. त्याने १० षटकार आणि ७ चौकार मारले.

आयपीएल 2023 मधील शुभमन गिलचे हे तिसरे शतक होते. गिलने या मोसमाच्या सुरुवातीला साखळी फेरीत सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शतके झळकावली होती.