मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ENG vs NZ Test : वेलिंग्टन कसोटी रोमांचक वळणावर! इंग्लंडचा एक फलंदाज बाद, पाचव्या दिवशी सामना रंगणार

ENG vs NZ Test : वेलिंग्टन कसोटी रोमांचक वळणावर! इंग्लंडचा एक फलंदाज बाद, पाचव्या दिवशी सामना रंगणार

Feb 27, 2023, 12:54 PM IST

    • New Zealand vs England 2nd Test Wellington Test Day 4 : वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडला २५८ धावांचे लक्ष्य दिले आहे. न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावानंतर २२६ धावांनी पिछाडीवर होता. तेथून न्यूझीलंडने फॉलोऑन खेळताना सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि दुसऱ्या डावात सर्वबाद ४८३ धावा केल्या.
ENG vs NZ Test

New Zealand vs England 2nd Test Wellington Test Day 4 : वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडला २५८ धावांचे लक्ष्य दिले आहे. न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावानंतर २२६ धावांनी पिछाडीवर होता. तेथून न्यूझीलंडने फॉलोऑन खेळताना सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि दुसऱ्या डावात सर्वबाद ४८३ धावा केल्या.

    • New Zealand vs England 2nd Test Wellington Test Day 4 : वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडला २५८ धावांचे लक्ष्य दिले आहे. न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावानंतर २२६ धावांनी पिछाडीवर होता. तेथून न्यूझीलंडने फॉलोऑन खेळताना सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि दुसऱ्या डावात सर्वबाद ४८३ धावा केल्या.

New Zealand vs England 2nd Test day 4 highlight : इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात वेलिंग्टन येथे कसोटी सामना सुरू आहे. हा कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. सामन्याच्या पहिल्या दोन दिवसात जिथे इंग्लंडचा संघ एकतर्फी वर्चस्व गाजवत होता, तिथे किवी संघाने पुढचे दोन दिवस वर्चस्व गाजवले. 

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावानंतर २२६ धावांनी पिछाडीवर होता. तेथून न्यूझीलंडने आता इंग्लंडला विजयासाठी २५८ धावांचे लक्ष्य दिले आहे. न्यूझीलंडने फॉलोऑन खेळताना सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि दुसऱ्या डावात सर्वबाद ४८३ धावा केल्या. 

वेलिंग्टन कसोटीत इंग्लंडने आपला पहिला डाव ८ बाद ४३५ धावांवर घोषित केला. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने १३८ धावांत ७ विकेट गमावल्या होत्या. येथे किवी संघ २९७ धावांनी पिछाडीवर होता. यानंतर तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या खालच्या फलंदाजांनी आपल्या संघाला २०९ धावांपर्यंत नेले. पहिल्या डावात २२६ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर किवी संघाला फॉलोऑन मिळाला.

तिसऱ्या दिवशी फॉलोऑन मिळाला, चौथ्या दिवशी २५८ धावांचे लक्ष्य

फॉलोऑन खेळताना किवी फलंदाजांनी चांगली झुंज देत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ गडी गमावून २०२ धावा केल्या. यानंतर आज (२७ फेब्रुवारी) सामन्याच्या चौथ्या दिवशीही किवी फलंदाजांनी दमदार खेळ दाखवला. केन विल्यमसन (१३२), टॉम ब्लंडेल (९०), डॅरिल मिशेल (५४) यांच्या खेळीमुळे किवी संघाने दुसऱ्या डावात सर्वबाद ४८३ धावा केल्या. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जॅक लीचने ५ बळी घेतले. अशाप्रकारे इंग्लंडला २५८ धावांचे लक्ष्य मिळाले.

इंग्लंडने पहिली विकेट गमावली

२५८ धावांच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघाने वेगवान सुरुवात केली. मात्र, चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी आपली पहिली विकेटही गमावली आहे. ३८ धावांवर जॅक क्रॉलीच्या (२४) रूपाने पहिली इंग्लिश विकेट पडली. खेळ संपला तेव्हा इंग्लंड संघाने १ बाद ४८ धावा केल्या आहेत. म्हणजेच पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी आणखी २१० धावा कराव्या लागतील, तर न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी इंग्लंडचे ८ विकेट्स घ्यावे लागणार आहेत.