मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Arjun Tendulkar: बॉम्बे टू गोवा! अर्जुनचं ठरलं, गोव्यात सरावाला सुरुवात, पाहा व्हिडीओ

Arjun Tendulkar: बॉम्बे टू गोवा! अर्जुनचं ठरलं, गोव्यात सरावाला सुरुवात, पाहा व्हिडीओ

Aug 15, 2022, 04:19 PM IST

    • Arjun Tendulkar starts Training at Goa: भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने गोव्यात सराव सुरू केला आहे. अर्जुन याआधी मुंबईसोबत होता, मात्र त्याला त्यांच्याकडून रणजीमध्ये पदार्पण करता आलेले नाही.
Arjun Tendulkar

Arjun Tendulkar starts Training at Goa: भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने गोव्यात सराव सुरू केला आहे. अर्जुन याआधी मुंबईसोबत होता, मात्र त्याला त्यांच्याकडून रणजीमध्ये पदार्पण करता आलेले नाही.

    • Arjun Tendulkar starts Training at Goa: भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने गोव्यात सराव सुरू केला आहे. अर्जुन याआधी मुंबईसोबत होता, मात्र त्याला त्यांच्याकडून रणजीमध्ये पदार्पण करता आलेले नाही.

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर गोव्यासाठी क्रिकेट खेळताना दिसू शकतो. अर्जुनने मुंबईकडून एनओसी मागितली असून पुढील सीझनमध्ये तो गोव्याकडून खेळणार असल्याची चर्चा आहे. अशातच आता अर्जुनचे सराव करतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यावरुन तो गोव्याकडून खेळणार हे नक्की झाले आहे. रविवारी अर्जुनने इंस्टाग्रामवर अनेक व्हिडिओ शेअर केले आहे, ज्यामध्ये तो गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सुविधांसह प्रशिक्षण घेताना दिसतो.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

डावखुरा वेगवान गोलंदाज असलेला अर्जुन इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. तसेच, अर्जुनने देशांतर्गत टी-20 स्पर्धा सईद मुश्ताक अली ट्रॉफी २०२०-२१ चे दोन सामने मुंबईसाठी खेळले होते. त्याने हरियाणा आणि पाँडेचेरी विरूद्ध मुंबईचे प्रतिनिधीत्व केले होते.

अर्जुनचा NOC साठी अर्ज

ज्युनियर तेंडुलकरने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना-हरकत प्रमाणपत्रासाठी (NOC) अर्ज केल्याची माहिती आहे. एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटने एका निवेदनात म्हटले आहे की, “करिअरच्या या टप्प्यावर अर्जुनसाठी जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवणे महत्त्वाचे आहे. आम्हाला विश्वास आहे की दुसऱ्या संघाकडून खेळल्याने अर्जुनला अधिक स्पर्धात्मक सामने खेळण्याची संधी मिळेल. तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचे नवे पर्व सुरू करत आहे".

सामना न खेळवताच संघातून वगळले

अर्जुन तेंडुलकरने तीन सीझनपूर्वी भारताच्या अंडर-19 संघाकडून श्रीलंकेविरुद्ध दोन सामने खेळले होते. त्यावेळी अर्जूनचा समावेश मुंबईच्या मर्यादित षटकांच्या संभाव्य संघातही होता. मात्र, अर्जुनला त्या मोसमात स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही. तसेच, त्याला सामना न खेळवताच मुंबई संघातून वगळण्यात आले. मात्र, आता अर्जुन तेंडूलकरचा गोव्याच्या वरिष्ठ संभाव्य संघात समावेश केला जावू शकतो. अशी माहिती गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (GCA) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.