मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Arjun Tendulkar: अर्जुनचा मुंबईला राम राम? पुढील सीझन ‘या’ संघाकडून खेळणार

Arjun Tendulkar: अर्जुनचा मुंबईला राम राम? पुढील सीझन ‘या’ संघाकडून खेळणार

Aug 11, 2022, 06:39 PM IST

    • Arjun Tendulkar leaves Mumbai: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आता मुंबई सोडून गोव्यासाठी क्रिकेट खेळताना दिसू शकतो. अर्जुनने मुंबईकडून एनओसी मागितली असून पुढील सीझनमध्ये तो गोव्याकडून खेळणार असल्याची चर्चा आहे.
Arjun Tendulkar

Arjun Tendulkar leaves Mumbai: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आता मुंबई सोडून गोव्यासाठी क्रिकेट खेळताना दिसू शकतो. अर्जुनने मुंबईकडून एनओसी मागितली असून पुढील सीझनमध्ये तो गोव्याकडून खेळणार असल्याची चर्चा आहे.

    • Arjun Tendulkar leaves Mumbai: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आता मुंबई सोडून गोव्यासाठी क्रिकेट खेळताना दिसू शकतो. अर्जुनने मुंबईकडून एनओसी मागितली असून पुढील सीझनमध्ये तो गोव्याकडून खेळणार असल्याची चर्चा आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन मुंबईचा संघ सोडण्याच्या तयारीत आहे. पुढील देशांतर्गत क्रिकेटचा सीझन तो गोव्यासाठी खेळताना दिसण्याची शक्यता आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेला अर्जुन इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

तसेच, अर्जुनने देशांतर्गत टी-20 स्पर्धा सईद मुश्ताक अली ट्रॉफी २०२०-२१ चे दोन सामने मुंबईसाठी खेळले होते. त्याने हरियाणा आणि पाँडेचेरी विरूद्ध मुंबईचे प्रतिनिधीत्व केले होते.

अर्जुनचा NOC साठी अर्ज

ज्युनियर तेंडुलकरने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना-हरकत प्रमाणपत्रासाठी (NOC) अर्ज केल्याची माहिती आहे. एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटने एका निवेदनात म्हटले आहे की, “करिअरच्या या टप्प्यावर अर्जुनसाठी जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवणे महत्त्वाचे आहे. आम्हाला विश्वास आहे की दुसऱ्या संघाकडून खेळल्याने अर्जुनला अधिक स्पर्धात्मक सामने खेळण्याची संधी मिळेल. तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचे नवे पर्व सुरू करत आहे".

सामना न खेळवताच संघातून वगळले

अर्जुन तेंडुलकरने तीन सीझनपूर्वी भारताच्या अंडर-19 संघाकडून श्रीलंकेविरुद्ध दोन सामने खेळले होते. त्यावेळी अर्जूनचा समावेश मुंबईच्या मर्यादित षटकांच्या संभाव्य संघातही होता. मात्र, अर्जुनला त्या मोसमात स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही. तसेच, त्याला सामना न खेळवताच मुंबई संघातून वगळण्यात आले.

मात्र, आता अर्जुन तेंडूलकरचा गोव्याच्या वरिष्ठ संभाव्य संघात समावेश केला जावू शकतो. अशी माहिती गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (GCA) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

सराव सामन्यातील कामगिरीच्या आधारे संघात स्थान मिळेल

जीसीएचे अध्यक्ष सूरज लोटलीकर यांनी अर्जुनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आम्ही डावखुरा वेगवान गोलंदाज शोधत आहोत. म्हणूनच आम्ही अर्जुन तेंडुलकरला गोवा संघात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. सीझनपूर्वी आम्ही मर्यादित षटकांचे सराव सामने खेळणार आहोत. तो या सामन्यांमध्ये खेळेल. या सामन्यातील त्याच्या कामगिरीच्या आधारे त्याच्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येतील".