मराठी बातम्या  /  धर्म  /  Budh Pradosh Vrat 2023 : बुध प्रदोष व्रत करताना लक्षात ठेवा या गोष्टी

Budh Pradosh Vrat 2023 : बुध प्रदोष व्रत करताना लक्षात ठेवा या गोष्टी

May 02, 2023, 03:32 PM IST

  • Pradosh Vrat : भगवान शिवशंकराची पूजा केल्याने आणि उपासना केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. यावेळेस वैशाख महिन्यातलं शुक्ल पक्षातलं दुसरं प्रदोष व्रत बुधवारी म्हणजेच ०३ मे रोजी पाळण्यात येत आहे.

प्रदोष व्रतात कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल (हिंदुस्तान टाइम्स)

Pradosh Vrat : भगवान शिवशंकराची पूजा केल्याने आणि उपासना केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. यावेळेस वैशाख महिन्यातलं शुक्ल पक्षातलं दुसरं प्रदोष व्रत बुधवारी म्हणजेच ०३ मे रोजी पाळण्यात येत आहे.

  • Pradosh Vrat : भगवान शिवशंकराची पूजा केल्याने आणि उपासना केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. यावेळेस वैशाख महिन्यातलं शुक्ल पक्षातलं दुसरं प्रदोष व्रत बुधवारी म्हणजेच ०३ मे रोजी पाळण्यात येत आहे.

हिंदू कॅलेंडरमध्ये प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला पाळलं जातं. प्रदोष व्रतात माता पार्वती आणि महादेव शिवशंकराची पूजा केली जाते. कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला हे व्रत पाळलं जातं. या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा केल्याने आणि उपासना केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. यावेळेस वैशाख महिन्यातलं शुक्ल पक्षातलं दुसरं प्रदोष व्रत बुधवारी म्हणजेच ०३ मे रोजी पाळण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया कधी आहे? सोनं खरेदी करण्याची ही शुभ वेळ नोंद करून ठेवा

Marriage Mantra : मुलींच्या लग्नासाठी सर्वात प्रभावी मंत्र, मुलांची रांग लागेल, एकदा आजमावून पाहा

Mangalsutra : सौभाग्याचं प्रतीक मंगळसुत्र घालण्याची परंपरा कधी आणि कशी सुरू झाली? जाणून घ्या

Rashtrasant Tukdoji Maharaj Jayanti : आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती, वाचा त्यांचा जीवन प्रवास

वैशाख महिन्यातील प्रदोष व्रताची पूजा कोणत्या मुहूर्तात करावी आणि त्याचे विधी काय आहेत ते जाणून घेऊया.

प्रदोष व्रत ०२ मेच्या रात्री ११.१७ वाजता सुरू होईल. दुसऱ्या दिवशी ०३ मे रोजी रात्री ११.४८ वाजता हे व्रत संपेल.

शुभ योग कोणते आहेत.

वैशाख महिन्यातल्या दुसऱ्या प्रदोष व्रताला अनेक शुभ योग बनत आहेत. या दिवशी रवी आणि सर्वार्थ सिद्धी योग येत आहेत. सर्वार्थ सिद्धी योग संध्याकाळी ०५.०२ ते रात्री ०८.५५ पर्यंत असेल तर रवियोग रात्री ०८५५ ते पहाटे ०५.०२ पर्यंत असेल.

पूजा मुहूर्त

बुध प्रदोष व्रताच्या पुजेचा शुभ मुहूर्त ०३ मे रोजी संध्याकाळी ०६.१२ ते रात्री ०८.२२ पर्यंत असेल. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त २४ तास असणार आहे.

बुध प्रदोष व्रत असं करावं

प्रदोष व्रतावर तुम्ही क्षमतेनुसार गाईचं दूध आणि तांदूळ दान करावं.

भगवान शिवांला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करा.

चंदनाने बेलपत्रावर ओम नम: शिवाय असं लिहावं. २१ बेलपत्रांवर ओम नम: शिवाय असं लिहून ते बेलपत्र शंकराच्या पिंडीवर अर्पण करावं.

या दिवशी ब्रम्हचर्य पाळावं आणि कोणतेही नकारात्मक निर्णय मनात येऊ देऊ नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा