मराठी बातम्या  /  धर्म  /  Vasant Panchami : २६ जानेवारीला श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा मिलाफ; क्वचितच येतो असा योग!

Vasant Panchami : २६ जानेवारीला श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा मिलाफ; क्वचितच येतो असा योग!

Jan 24, 2023, 02:33 PM IST

  • Rare Combination Of Republic Day & Vasant Panchami 2023 : यापूर्वी हा योग फक्त तीन वेळा पाहायला मिळाला आहे. सर्वात आधी हा योग अनुभवला गेला तो २६ जानेवारी १९६६रोजी, त्यानंतर २६ जानेवारी १९८५ साली वसंत पंचमी आणि २६ जानेवारी एकत्र साजरे झाले होते आणि अगदी अलिकडे २६ जानेवारी २००४ साली.

वसंत पंचमी आणि प्रजासत्ताक दिन एकत्र (हिंदुस्तान टाइम्स)

Rare Combination Of Republic Day & Vasant Panchami 2023 : यापूर्वी हा योग फक्त तीन वेळा पाहायला मिळाला आहे. सर्वात आधी हा योग अनुभवला गेला तो २६ जानेवारी १९६६रोजी, त्यानंतर २६ जानेवारी १९८५ साली वसंत पंचमी आणि २६ जानेवारी एकत्र साजरे झाले होते आणि अगदी अलिकडे २६ जानेवारी २००४ साली.

  • Rare Combination Of Republic Day & Vasant Panchami 2023 : यापूर्वी हा योग फक्त तीन वेळा पाहायला मिळाला आहे. सर्वात आधी हा योग अनुभवला गेला तो २६ जानेवारी १९६६रोजी, त्यानंतर २६ जानेवारी १९८५ साली वसंत पंचमी आणि २६ जानेवारी एकत्र साजरे झाले होते आणि अगदी अलिकडे २६ जानेवारी २००४ साली.

१९ वर्षांनंतर २६ जानेवारीच्या दिवशी एक दुर्मिळ योग येत आहे. २६ जानेवारी रोजी एकीकडे दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनाने देशाची छाती अभिमानाने फुलून जाणार आहे, तर दुसरीकडे सरस्वती देवीच्या पुजनाने देशात भक्तीचं वातावरणही पाहायला मिळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ravi Pradosh Vrat 2024 : मे महिन्याचे पहिले प्रदोष वृत कधी? शुभ मुहूर्त, पुजा कशी करायची? जाणून घ्या

May 2024 Shubh Muhurat : विवाह, गृहप्रवेश ते नामकरण… मे महिन्यातील शुभ मुहूर्तांची यादी जाणून घ्या

Auspicious Yogas : तुमच्या कुंडलीत हे ४ योग आहेत का? असतील तर एक दिवस तुम्ही नक्की करोडपती व्हाल!

Hanuman Jayanti : हनुमान जन्मोत्सव आणि हनुमान जयंतीत काय फरक आहे? तुमचाही गोंधळ होतो, जाणून घ्या

वसंत पंचमी आणि २६ जानेवारी असा दुग्धशर्करा योग तब्बल १९ वर्षांनी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

या आधी कधी पाहायला मिळाला असा संयोग

यापूर्वी हा योग फक्त तीन वेळा पाहायला मिळाला आहे. सर्वात आधी हा योग अनुभवला गेला तो २६ जानेवारी १९६६रोजी, त्यानंतर २६ जानेवारी १९८५ साली वसंत पंचमी आणि २६ जानेवारी एकत्र साजरे झाले होते आणि अगदी अलिकडे २६ जानेवारी २००४ साली म्हणजेच तब्बल १९ वर्षांपूर्वी हा अनोखा योग पाहायला मिळाला होता.

यंदाच्या २६ जानेवारीला बनतायत चार खास योग

याशिवाय यंदाची खास बात म्हणजे २६ जानेवारी २०२३ रोजी चार खास शुभ योगही पाहायला मिळणार आहेत, ज्यांनी २६ जानेवारीच्या उत्साहात चार चांद लागणार आहेत यात शंका नाही. या वर्षी शिवयोग,सिद्ध योग,सर्वार्थसिद्धी योग आणि रवियोग पाहायला मिळणार आहेत.

देशभरात कसं असेल वातावरण

यंदा देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिवस अपार उत्साहात कर्तव्यपथावर साजरा केला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकावला जाईल.अमर जवान स्मृतीस्थळावर जाऊन शहीद वीरांना सलामी दिली जाईल, त्यानंतर देश आपली हवाई,सामुद्रिक आणि जमिनीवरची ताकद जगाला दाखवेल. त्यानंतर येणारे वेगवेगळ्या राज्यातले चित्ररथ लक्ष वेधून घेतील.

एकीकडे हा शानदार सोहळा पार पडत असताना तो सोहळा आपल्या मनात साठवत देवी सरस्वतीची पूजा करण्यात भाविक दंग असतील. एकीकडे देशाभिमान तर दुसरीकडे श्रद्धा असा अनोखा मिलाफ यानिमित्ताने देशभर पाहायला मिळणार आहे. 

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा