मराठी बातम्या  /  धर्म  /  Gajanan Maharaj Palkhi Sohla :गण गण गणात बोतेच्या गजरात उद्या गजानन महाराजांची पालखी ठेवणार प्रस्थान

Gajanan Maharaj Palkhi Sohla :गण गण गणात बोतेच्या गजरात उद्या गजानन महाराजांची पालखी ठेवणार प्रस्थान

May 25, 2023, 03:01 PM IST

  • Gajanan Maharaj Palkhi Sohla Shegaon : जेष्ठ शुद्ध सप्तमीच्या दिवशी शेगाव इथनं श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूर इथं जाण्यासाठी आपलं प्रस्थान ठेवेल. पहाटे लवकर गजानन महाराजांची पालखी आपल्या एक महिन्याच्या पंढरीच्या यात्रेला सुरूवात करेल.

संत गजानन महाराज पालखी सोहळा (Twitter)

Gajanan Maharaj Palkhi Sohla Shegaon : जेष्ठ शुद्ध सप्तमीच्या दिवशी शेगाव इथनं श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूर इथं जाण्यासाठी आपलं प्रस्थान ठेवेल. पहाटे लवकर गजानन महाराजांची पालखी आपल्या एक महिन्याच्या पंढरीच्या यात्रेला सुरूवात करेल.

  • Gajanan Maharaj Palkhi Sohla Shegaon : जेष्ठ शुद्ध सप्तमीच्या दिवशी शेगाव इथनं श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूर इथं जाण्यासाठी आपलं प्रस्थान ठेवेल. पहाटे लवकर गजानन महाराजांची पालखी आपल्या एक महिन्याच्या पंढरीच्या यात्रेला सुरूवात करेल.

जेष्ठ शुद्ध सप्तमीच्या दिवशी शेगाव इथनं श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूर इथं जाण्यासाठी आपलं प्रस्थान ठेवेल. पहाटे लवकर गजानन महाराजांची पालखी आपल्या एक महिन्याच्या पंढरीच्या यात्रेला सुरूवात करेल. शुक्रवारी पहाटे गजानन महाराजांची पालखी शेगावातनं बाहेर पडेल. त्यावेळेस पारंपारीक ढोलताशांच्या गजरात, तुतारी आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा रंगेल. या पालखी प्रस्थानाला आसपासची लोकं, भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतील असं नेहमीचं चित्र आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही या वस्तू खरेदी करू नका, नाहीतर आयुष्यभर घरात दारिद्र्य राहील

Ganga Saptami 2024 : यंदा गंगा सप्तमी कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Varuthini Ekadashi 2024 : काय आहे वरुथिनी एकादशीचे महत्त्व? कशी मिळते पापातून मुक्ती? वाचा संपूर्ण कथा

Festival List May 2024 : मे महिन्यातील सण-उत्सव, जयंतीची संपूर्ण यादी; जाणून घ्या तारीख, वार आणि महत्व

संत गजानन महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचं हे ५५ वं वर्ष आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि गण गण गणात बोते या नामाचा गजर होईल. ही पालखी तब्बल १ महिन्याची मजल दरमजल करत २७ जून २०२३ रोजी पंढरपूर इथं विठुरायाच्या चरणी दाखल होईल.

शेगाव इथनं प्रस्थान ठेवणाऱ्या संत गजानन महाराज पालखी मार्गावरील वाहतुकीतही बदल करण्यात आला आहे. पालखी मार्गावर होणारी भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेता चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. आयत्यावेळेस गर्दीने खोळंबा झाल्यास पालखी बाबत योग्य निर्णय घेण्याचा अधिकार पालखी प्रमुखांना राहाणार आहे.

दरवर्षी महाराष्ट्रातून ४३ पालख्या पंढरपुरात आषाढी वारीसाठी दाखल होतात. या पालख्यांमध्ये माऊलींची पालखी, तुकोबारायांची पालखी, सोपानकाकांची पालखी या मुक्ताईंची पालखी, गजानन महाराजांची पालखी या पालख्या आकर्षणाचं केंद्र ठरतात.

ज्ञानोबारायांची पालखी ११ जून रोजी ठेवणार प्रस्थान

माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीत अनेक दिंड्यातून दाखल होतात. १२ जूनला श्रींची पालखी गांधी वाड्यात दाखल होणार आहे. त्यानंतर पालखी मार्गस्थ होईल, असे देवस्थानच्या वतीने व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले.

तुकोबारायांची पालखी १० जून रोजी ठेवणार प्रस्थान

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी यावर्षी देहूतून १० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून २८ जून रोजी संत तुकोबारायांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. यंदा पालखी सोहळ्याचे ३३८ वे वर्ष आहे. पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी पालखी सोहळ्याबाबतची माहिती दिली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा