मराठी बातम्या  /  धर्म  /  Chaityabhoomi: चैत्यभूमीवर जनसागर, Live पाहण्यासाठी इथं क्लिक करा!

Chaityabhoomi: चैत्यभूमीवर जनसागर, Live पाहण्यासाठी इथं क्लिक करा!

Dec 06, 2022, 10:41 AM IST

  • Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din: मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमीचं थेट प्रक्षेपण आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेलं आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (हिंदुस्तान टाइम्स)

Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din: मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमीचं थेट प्रक्षेपण आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेलं आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे.

  • Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din: मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमीचं थेट प्रक्षेपण आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेलं आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. 

Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din: आज ६ डिसेंबर अर्थातच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. आजच्या दिवशी या महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्यातल्याच नव्हे तर देशातल्या कानाकोपऱ्यातनं लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल होत असतात. यंदा कोरोनाच्या प्रभावापासून मुक्त झाल्यानंतर आंबेडकरांच्या अनुयायाची तुफान गर्दी चैत्यभूमीवर उसळलेली पाहायला मिळत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला आज अरबी समुद्राच्या साक्षीने अथांग असा भीमसागर लोटला आहे. मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेनेही दादर ते चैत्यभूमी असा चोख बंदोबस्त ठेवला आहे. ठिकठिकाणी आरोग्य शिबिरं भरवण्यात आली आहेत. चैत्यभूमीपर्यंत पोहोचायला ठिकठिकाणी मार्गदर्शक बॅनरही मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लावण्यात आले आहेत. तर बाबासाहेबांच्या आणि बौद्द धर्माची माहिती देणारी पुस्तकंही इथं पाहायला मिळत आहेत, ज्याला भीमसैनिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया कधी आहे? सोनं खरेदी करण्याची ही शुभ वेळ नोंद करून ठेवा

Marriage Mantra : मुलींच्या लग्नासाठी सर्वात प्रभावी मंत्र, मुलांची रांग लागेल, एकदा आजमावून पाहा

Mangalsutra : सौभाग्याचं प्रतीक मंगळसुत्र घालण्याची परंपरा कधी आणि कशी सुरू झाली? जाणून घ्या

Rashtrasant Tukdoji Maharaj Jayanti : आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती, वाचा त्यांचा जीवन प्रवास

चैत्यभूमीवरील प्रत्येक क्षणाची अपडेट खालील लिंकवर…

आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासहित अनेक आमदार, खासदार आणि इतर नेतेमंडळींनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंदू मिल इथलं बाबासाहेबांचं स्मारक २०२४ पर्यंत पूर्ण होईल आणि जगाला त्याचा हेवा वाटेल अशं आश्वासन दिलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेबांना अभिवादन करताना त्यांनी बनवलेल्या घटनेची शक्ती अशी आहे की एक चहावाला आज देशाचा पंतप्रधान झाला आणि याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार करून देत असतात असं सांगितलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बाबासाहेबांच्या विचारांना अनुरुप असा देश बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत असं सांगितलं. यावेळेस काही विशिष्ट मुलांनाही नेतेमंडळींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.

सध्या दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. रांगेत उभं राहून शिस्तीत भीमसैनिक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उभा आहे. दादरच्या चैत्यभूमीहून याचं थेट प्रक्षेपण मुंबई महानगर पालिकेच्या वेबसाईटवरून आपल्याला पाहाता येणार आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा