मराठी बातम्या  /  धर्म  /  Chaitra Kalashtami 2023 : भगवान शिवाचं रौद्र रूप म्हणजे कालभैरव, १३ तारखेला होणार कालाष्टमी साजरी

Chaitra Kalashtami 2023 : भगवान शिवाचं रौद्र रूप म्हणजे कालभैरव, १३ तारखेला होणार कालाष्टमी साजरी

Apr 11, 2023, 11:13 AM IST

  • Kalbhairav Kalashtami :  कालाष्टमीच्या दिवशी राहू आणि केतूची पीडा मागे लागली असल्यास कालभैरवाची पूजा करावी. कालभैरव हे भगवान शंकराचं रौद्र रूप आहे.

चैत्र कालाष्टमी (हिंदुस्तान टाइम्स)

Kalbhairav Kalashtami : कालाष्टमीच्या दिवशी राहू आणि केतूची पीडा मागे लागली असल्यास कालभैरवाची पूजा करावी. कालभैरव हे भगवान शंकराचं रौद्र रूप आहे.

  • Kalbhairav Kalashtami :  कालाष्टमीच्या दिवशी राहू आणि केतूची पीडा मागे लागली असल्यास कालभैरवाची पूजा करावी. कालभैरव हे भगवान शंकराचं रौद्र रूप आहे.

येत्या १३ एप्रिल २०२३ रोजी म्हणजेच गुरूवारी मासिक कालाष्टमी साजरी केली जाईल. ही कालाष्टमी चैत्र महिन्यातली असल्याने याला चैत्र कालाष्टमी असंही ओळखलं जाईल. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या आठव्या दिवशी कालाष्टमी साजरी केली जाते.महादेवाचे एक रौद्र रूप म्हणजेच कालभैरव मानले जातात. मान्यतेनुसार शनी आणि राहूच्या दशेपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव यांची पूजा केली जाते.

ट्रेंडिंग न्यूज

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया कधी आहे? सोनं खरेदी करण्याची ही शुभ वेळ नोंद करून ठेवा

Marriage Mantra : मुलींच्या लग्नासाठी सर्वात प्रभावी मंत्र, मुलांची रांग लागेल, एकदा आजमावून पाहा

Mangalsutra : सौभाग्याचं प्रतीक मंगळसुत्र घालण्याची परंपरा कधी आणि कशी सुरू झाली? जाणून घ्या

Rashtrasant Tukdoji Maharaj Jayanti : आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती, वाचा त्यांचा जीवन प्रवास

कालभैरवाची पूजा म्हणजे कोणत्याही गोष्टीबाबत भीती वाटत असेल तर त्यापासून भैरव म्हणजे त्या भीतीपासून रक्षा करणारा असा त्याचा अर्थ होतो. या दिवशी ऊॅं कालभैलवाय नम: चा जप अवश्य करावा. तुमच्यावर शनि आणि राहू यांची दशा असेल तर कालभैरवाचं स्मरण करावं.

वर्षात होतात १२ कालाष्टमी

दर महिन्याला एक कालाष्टमी याप्रमाणे वर्षभरात १२ कालाष्टमी पाहायला मिळतात. हा दिवस भगवान भैरवनाथाला समर्पित आहे. या दिवशी भैरवनाथाची पूजा आणि उपवास केले जातात. चंद्र महिन्यातल्या कृष्ण पक्ष अष्टमी तिथीला हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी हिंदू भाविक भगवान भैरवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील करतात.

वैशाख कालाष्टमी व्रत २०२३ तिथी मुहूर्त

पंचांगानुसार, यावेळी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी गुरुवार १३ एप्रिल रोजी पहाटे ०३.४३ वाजता सुरू होत आहे. ही तिथी १४ एप्रिल रोजी पहाटे ०१.३३ वाजता संपत आहे. काल भैरवाची निशिता मुहूर्तावर पूजा केली जाते, म्हणून अष्टमी तिथीचा निशिता मुहूर्त १३ एप्रिलला आहे. अशा परिस्थितीत १३ एप्रिलला चैत्र मासिक कालाष्टमी आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा