मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Chaitra Navratri 2023 : दुर्गाष्टमीला का केला जातं माता अन्नपूर्णेचं पूजन?, काय आहे त्यामागची कहाणी

Chaitra Navratri 2023 : दुर्गाष्टमीला का केला जातं माता अन्नपूर्णेचं पूजन?, काय आहे त्यामागची कहाणी

Mar 29, 2023, 08:31 AMIST

Annapurna Mata Poojan : अन्नपूर्णा देवीची पूजा ही नवरात्रीच्या अष्टमीला केली जाते. याच दिवशी कुमारिकांना घरी बोलावून त्यांना जेऊ घालण्याचीही पद्धत आहे.

नवरात्रीच्या आठव्या दिवशी (अष्टमी) माता दुर्गेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते. हे रूप देवी अन्नपूर्णेचं रुप म्हणूनही पाहिलं जातं. त्यामुळे अष्टमीच्या दिवशी कन्या पूजनासोबतच अन्नपूर्णा मातेचीही पूजा केली जाते.अन्नपूर्णा देवीची पूजा केल्यास अन्न व वस्त्राची कमतरता दूर होते, असे सांगितले जाते.
(1 / 4)

देवी अन्नपूर्णा हे दुर्गेचेच एक रुप आहे. लग्न झाल्यावर सासरी जाताना आजही नववधूच्या हाती माहेरचीमंडळी देवी अन्नपूर्णेची लहान मूर्ती देतात. ही अन्नपूर्णा सासरच्या देवघरात ठेवली जाते. सासरी आलेल्या नववधूने सासरच्या लोकांना प्रेमाने खाऊ घालावं आणि त्या घरावर त्या मुलीच्या रुपात अन्नपूर्णेचा आशिर्वाद असावा अशी त्यामागची भावना असते.(फाइल फोटो, फेसबुक सौजन्याने)
(2 / 4)

अन्नपूर्णा पूजेच्या टिप्स- अन्नपूर्णा पूजेच्या दिवशी गरीबांना पितळ्याच्या भांड्यात तांदूळ दान करा. असं केल्याने देवी प्रसन्न होते असं सांगितलं जातं. अशा प्रकारे तांदूळ दान केल्याने घरात अन्नाची कमतरता जाणवत नाही अशी यामागची भावना आहे.
(3 / 4)

अन्नपूर्णा पूजेला काय करावे - अन्नपूर्णा पूजेला चांदीची नाणी घरी आणावी. जाणकार सांगतात. या दिवशी एखाद्याला धन दान करणे देखील शुभ असते. देवी अन्नपूर्णेची मूर्ती देवघरात किंवा स्वयंपाक घरात ठेवावी असं केल्याने घरात धनधान्याची कमतरता भासत नाही असं सांगितलं जातं.(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
(4 / 4)

    शेअर करा