मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  देशात गव्हाचा तुटवडा तर तांदळाचं उत्पादन वाढलं; धान्याच्या टंचाईची कितपत शक्यता?

देशात गव्हाचा तुटवडा तर तांदळाचं उत्पादन वाढलं; धान्याच्या टंचाईची कितपत शक्यता?

May 20, 2022, 04:13 PMIST

भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गव्हाचं उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळंच केंद्र सरकारनं गव्हाच्या विदेशी निर्यातीवर बंदी घातली आहे.

भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गव्हाचं उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळंच केंद्र सरकारनं गव्हाच्या विदेशी निर्यातीवर बंदी घातली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाच्या उत्पादनात तीन टक्क्यांची घट होऊ शकते. गेल्या वर्षी देशात १०९.५९ दशलक्ष टन गव्हाचं उत्पादन झालं होतं. यावर्षी हे उत्पादन १०६.४१ दशलक्ष टनांपर्यंत कमी होऊ शकते. कृषी मंत्रालयानं यासंदर्भातली माहिती जारी केली आहे.
(1 / 7)
गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाच्या उत्पादनात तीन टक्क्यांची घट होऊ शकते. गेल्या वर्षी देशात १०९.५९ दशलक्ष टन गव्हाचं उत्पादन झालं होतं. यावर्षी हे उत्पादन १०६.४१ दशलक्ष टनांपर्यंत कमी होऊ शकते. कृषी मंत्रालयानं यासंदर्भातली माहिती जारी केली आहे.(HT)
गेल्या काही महिन्यांपासून देशात उष्णतेची लाट आलेली असल्यानं अनेक राज्यांमध्ये गव्हाचं उत्पादन २० टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे.
(2 / 7)
गेल्या काही महिन्यांपासून देशात उष्णतेची लाट आलेली असल्यानं अनेक राज्यांमध्ये गव्हाचं उत्पादन २० टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे.(HT)
आता भारताने गव्हाच्या परदेशी निर्यातीवर बंदी घातलेली आहे. देशात अन्नधान्याचा पुरवठा सुरक्षित रहावा यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
(3 / 7)
आता भारताने गव्हाच्या परदेशी निर्यातीवर बंदी घातलेली आहे. देशात अन्नधान्याचा पुरवठा सुरक्षित रहावा यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.(HT)
रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळं जागतिक बाजारपेठेत गव्हाचा तुटवडा निर्माण झालेला आहे. रशिया आणि युक्रेनचा जगातील गव्हाच्या निर्यातीपैकी एक तृतीयांश वाटा आहे. भारताकडे भरपूर प्रमाणात गव्हाचा साठा असल्यानं तुर्कीसह अनेक देशांनी भारताला गव्हाचा पुरवठा करण्याची मागणी केली होती.
(4 / 7)
रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळं जागतिक बाजारपेठेत गव्हाचा तुटवडा निर्माण झालेला आहे. रशिया आणि युक्रेनचा जगातील गव्हाच्या निर्यातीपैकी एक तृतीयांश वाटा आहे. भारताकडे भरपूर प्रमाणात गव्हाचा साठा असल्यानं तुर्कीसह अनेक देशांनी भारताला गव्हाचा पुरवठा करण्याची मागणी केली होती.(HT)
यापूर्वी फेब्रुवारीत भारताकडे १११.३२ दशलक्ष टन गव्हाचा साठा होता. परंतु आता येत्या काही महिन्यात भारतात गव्हाचं उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(5 / 7)
यापूर्वी फेब्रुवारीत भारताकडे १११.३२ दशलक्ष टन गव्हाचा साठा होता. परंतु आता येत्या काही महिन्यात भारतात गव्हाचं उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.(HT)
एकीकडं देशात गव्हाचं उत्पादन कमी होत असताना तांदळाच्या उत्पादनात मात्र लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
(6 / 7)
एकीकडं देशात गव्हाचं उत्पादन कमी होत असताना तांदळाच्या उत्पादनात मात्र लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.(HT)
देशात तांदळाचं उत्पादन ४.२ टक्क्यांनी वाढून १२९.६ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन १२४.३८ दशलक्ष टन होतं.
(7 / 7)
देशात तांदळाचं उत्पादन ४.२ टक्क्यांनी वाढून १२९.६ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन १२४.३८ दशलक्ष टन होतं.(HT)

    शेअर करा