मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  उन्हाळ्यात फिरायला जायचंय? ही आहेत टॉप १० ठिकाणं.

उन्हाळ्यात फिरायला जायचंय? ही आहेत टॉप १० ठिकाणं.

Aug 26, 2022, 03:28 PMIST

आधी प्रवास करा आणि मग पैेसे भरा या या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या प्रवासी कंपन्यांच्या धोरणामुळे आता आंतरराष्ट्रीय ठिकाणांना भेटी देणं सहज शक्य झालंय. मग आता उन्हाळ्यातही अशी खास ठिकाणं आहेत जिथं फिरायला जाणं तुम्हाला सहज शक्य आहे. पाहा उन्हाळ्यात भेट देऊ शकणारी जगातली टॉप १० पर्यटनस्थळं.

आधी प्रवास करा आणि मग पैेसे भरा या या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या प्रवासी कंपन्यांच्या धोरणामुळे आता आंतरराष्ट्रीय ठिकाणांना भेटी देणं सहज शक्य झालंय. मग आता उन्हाळ्यातही अशी खास ठिकाणं आहेत जिथं फिरायला जाणं तुम्हाला सहज शक्य आहे. पाहा उन्हाळ्यात भेट देऊ शकणारी जगातली टॉप १० पर्यटनस्थळं.

उन्हाळा असला तरी पर्यटक मात्र आपल्या फिरण्याच्या आवडीला मुरड घालत नाहीत. गेली दोन वर्ष करोनामुळे घरात बसाव लागलं होतं. आता मात्र करोनाचं भय दूर झाल्यावर पर्यटक पुन्हा एकदा बॅग भरुन बाहेर पडले आहेत. अनेक पर्यटन कंपन्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आधी प्रवास करा, मग पैसे भरा अशी पॉलिसी राबवताना पाहायला मिळत असल्याने पर्यटकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.
(1 / 11)
उन्हाळा असला तरी पर्यटक मात्र आपल्या फिरण्याच्या आवडीला मुरड घालत नाहीत. गेली दोन वर्ष करोनामुळे घरात बसाव लागलं होतं. आता मात्र करोनाचं भय दूर झाल्यावर पर्यटक पुन्हा एकदा बॅग भरुन बाहेर पडले आहेत. अनेक पर्यटन कंपन्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आधी प्रवास करा, मग पैसे भरा अशी पॉलिसी राबवताना पाहायला मिळत असल्याने पर्यटकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.(Photo by Jingxi Lau on Unsplash)
१ थायलंड. गोव्यात जायला लागणाऱ्या पैशांमध्येच थायलंडची सफर होऊ शकतेय. थायलंड सरकारनेही पर्यटकांसाठी अनेक नव्या योजना जाहीर केल्या आहेत. पहिल्यापासून थायलंड जगभरातल्या पर्यटकांसाठी आवडतं स्थान आहे.
(2 / 11)
१ थायलंड. गोव्यात जायला लागणाऱ्या पैशांमध्येच थायलंडची सफर होऊ शकतेय. थायलंड सरकारनेही पर्यटकांसाठी अनेक नव्या योजना जाहीर केल्या आहेत. पहिल्यापासून थायलंड जगभरातल्या पर्यटकांसाठी आवडतं स्थान आहे.(Unsplash)
२ मालदीव्स. नव्यानं लग्न झालेल्या जोडप्यांसाठी मालदीव्स सर्वात आवडतं ठिकाण आहे.मासे प्रेमींसाठी ही जागा अत्यंत आवडती, त्याचप्रमाणे वॉटर स्पोर्टसचा थरार अनुभवायचा असेल तर मावदीव्स एक उत्तम ठिकाण म्हणून ओळखलं गेलंय.
(3 / 11)
२ मालदीव्स. नव्यानं लग्न झालेल्या जोडप्यांसाठी मालदीव्स सर्वात आवडतं ठिकाण आहे.मासे प्रेमींसाठी ही जागा अत्यंत आवडती, त्याचप्रमाणे वॉटर स्पोर्टसचा थरार अनुभवायचा असेल तर मावदीव्स एक उत्तम ठिकाण म्हणून ओळखलं गेलंय.(File Photo)
३ आईसलॅन्ड. भारतीय हिमालयाची आपली एक वेगळी ओळख असली तरी मनोहारी दृष्य पाहायला किंवा धबधबे पाहायला आईसलॅन्ड एक उत्तम ठिकाण म्हणून पसंती पावलं आहे. हे ठिकाणही एक चांगला ऑप्शन पर्यटकांसाठी ठरतोय.
(4 / 11)
३ आईसलॅन्ड. भारतीय हिमालयाची आपली एक वेगळी ओळख असली तरी मनोहारी दृष्य पाहायला किंवा धबधबे पाहायला आईसलॅन्ड एक उत्तम ठिकाण म्हणून पसंती पावलं आहे. हे ठिकाणही एक चांगला ऑप्शन पर्यटकांसाठी ठरतोय.(Unsplash)
४ नॉर्वे. जंगलं, पर्वत रांगा, सर्वोत्तम नजारे यासाठी भारतीय पर्यटक नॉर्वेला आपली पसंती देताना पाहायला मिळतायत. मत्स्यप्रेमींसाठी ही जागा पर्वणी आहे तर शाकाहारी लोकांसाठीही ताज्या भाज्या इथं उपलब्ध आहेत. डेअरी प्रोडक्टस इथं मोठया प्रमाणावर बनवले जातात.
(5 / 11)
४ नॉर्वे. जंगलं, पर्वत रांगा, सर्वोत्तम नजारे यासाठी भारतीय पर्यटक नॉर्वेला आपली पसंती देताना पाहायला मिळतायत. मत्स्यप्रेमींसाठी ही जागा पर्वणी आहे तर शाकाहारी लोकांसाठीही ताज्या भाज्या इथं उपलब्ध आहेत. डेअरी प्रोडक्टस इथं मोठया प्रमाणावर बनवले जातात.(Unsplash)
५ मलेशिया. : थायलंड नंतर खिशाला परवडणाऱ्या पर्यटनस्थळांमध्ये मलेशिया एक अत्यंत आवडतं ठिकाण म्हणून जगात परिचित आहे. आशियातल्या पर्यटकांमध्ये मलेशिया आपुलकीचं स्थान म्हणूनही परिचित आहे.
(6 / 11)
५ मलेशिया. : थायलंड नंतर खिशाला परवडणाऱ्या पर्यटनस्थळांमध्ये मलेशिया एक अत्यंत आवडतं ठिकाण म्हणून जगात परिचित आहे. आशियातल्या पर्यटकांमध्ये मलेशिया आपुलकीचं स्थान म्हणूनही परिचित आहे.(REUTERS)
६ स्वित्झल्ँड. बर्फाचे मनोहारी नजारे आणि स्कीइंग सारखे खेळ खेळायचे असतील तर या जागेसारखी दुसरी जागा जगात नाही. या जागेला स्वर्ग म्हणूनही ओळखलं जातं. 
(7 / 11)
६ स्वित्झल्ँड. बर्फाचे मनोहारी नजारे आणि स्कीइंग सारखे खेळ खेळायचे असतील तर या जागेसारखी दुसरी जागा जगात नाही. या जागेला स्वर्ग म्हणूनही ओळखलं जातं. (Anthony Anex/KEYSTONE/picture alliance )
७ इंडोनेशिया. करोनानंतर बाली हे पर्यटकांचं अत्यंत आवडतं स्थळ खुलं करण्यात आलं आहे. निसर्गाची वैविध्यता आणि सुंदर समुद्रकिनारे. कमी किंतीत जास्त आनंद घ्यायला पर्यटक इथे आले नसते तरच नवल. जून आणि जुलैदरम्यान होणारा बालीचा पतंग उत्सव आणि बाली आर्ट फेस्टिव्हल यामुळे बाली जगातल्या पर्यटकांचं एक आवडतं स्थान आहे.
(8 / 11)
७ इंडोनेशिया. करोनानंतर बाली हे पर्यटकांचं अत्यंत आवडतं स्थळ खुलं करण्यात आलं आहे. निसर्गाची वैविध्यता आणि सुंदर समुद्रकिनारे. कमी किंतीत जास्त आनंद घ्यायला पर्यटक इथे आले नसते तरच नवल. जून आणि जुलैदरम्यान होणारा बालीचा पतंग उत्सव आणि बाली आर्ट फेस्टिव्हल यामुळे बाली जगातल्या पर्यटकांचं एक आवडतं स्थान आहे.(Unsplash)
८ ग्रीस. ग्रीक पौराणिक कथा आणि इथलं पारंपारिक जेवण.युरोपमध्ये प्रवासातलं पहिलं पाऊल ग्रीकमध्ये ठेवलं जातं. उन्हाळ्यातलं हे एक सर्वात महत्वाचं पर्यटन स्थळ आहे.
(9 / 11)
८ ग्रीस. ग्रीक पौराणिक कथा आणि इथलं पारंपारिक जेवण.युरोपमध्ये प्रवासातलं पहिलं पाऊल ग्रीकमध्ये ठेवलं जातं. उन्हाळ्यातलं हे एक सर्वात महत्वाचं पर्यटन स्थळ आहे.(Unsplash)
९ इटली. ज्यांना थिएटर, आर्ट या गोष्टीत रस आहे त्यांची पावलं इथं वळली नाही तरच नवल.वर्षभर इथं पर्यटकांचा राबता पाहायला मिळतो. 
(10 / 11)
९ इटली. ज्यांना थिएटर, आर्ट या गोष्टीत रस आहे त्यांची पावलं इथं वळली नाही तरच नवल.वर्षभर इथं पर्यटकांचा राबता पाहायला मिळतो. (File Photo)
१० पॅरीस. विंटेज वाईन आणि मऊशार चीज खाण्यासाठी खवय्यांची पहिली पसंती.नवविवाहित जोडप्यांसाठीही हनिमुनची एक अत्यंत आवडती जागा म्हणून पॅरीसला पसंती आहे.
(11 / 11)
१० पॅरीस. विंटेज वाईन आणि मऊशार चीज खाण्यासाठी खवय्यांची पहिली पसंती.नवविवाहित जोडप्यांसाठीही हनिमुनची एक अत्यंत आवडती जागा म्हणून पॅरीसला पसंती आहे.(Unsplash, Disneyland)

    शेअर करा